बीसीसीआयकडून ‘डब्ल्यूपीएल’चे वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयकडून ‘डब्ल्यूपीएल’चे वेळापत्रक जाहीर

वुमन्स प्रीमिअर लीग म्हणजेचं डब्ल्यूपीएल संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वुमन्स प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी बीसीसीआयने या स्पर्धांना सुरुवात केली होती. यंदाचे हे दुसरे वर्षे असून क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

वेळापत्रकानुसार, स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अंतिम फेरीचा सामना १७ मार्चला होणार आहे. यंदा स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. ही स्पर्धा यंदा दोन ठिकाणी खेळवली जाणार आहे. सुरुवातीचे सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात, तर दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात होतील.

स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यापासून होणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. अंतिम फेरीपर्यंत एकूण २२ सामने होणार आहेत. १३ मार्चपर्यंत साखळी फेरीचे सामने होतील. तर १५ मार्चला एलिमिनेटर फेरी पार पडेल. तसेच अंतिम फेरीचा सामना १७ मार्चला होणार आहे. सर्व सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.

हे ही वाचा:

हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार

एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा

शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या

कोट्यवधींच्या सुवर्णदागिन्यांनी सजला रामलल्ला!

गतवर्षी म्हणजे पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले होते. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. क्रिकेट रसिकांचाही या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Exit mobile version