विशाळ गडावर झालेल्या दगडफेकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून छत्रपती संभाजी राजे यांच्याशीही चर्चा झाली आहे. विशाळ गडावरचं अतिक्रमण काढून गडाचे पावित्र्य राखले पाहिजे आणि गडाचा ऐतिहासिकपणा देखील जपला पाहिजे, अशी छत्रपती संभाजी राजे यांची मागणी आहे. गडाचा ऐतिहासिकपणा जपला पाहिजे अशी शासनाची देखील भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता छत्रपती संभाजी राजे आणि हजारो शिवभक्त आज विशाळ गडावर दाखल झाले आहेत. तत्पूर्वी गडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. परिसरातील राहणाऱ्या स्थानिकांनी हा दगडफेकीचा आरोप केला आहे. याचा व्हिडिओ देखील स्थानिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा:
सुरतच्या हिरे कारागिरांची कमाल, आठ कॅरेटच्या हिऱ्यावर पंतप्रधान मोदींची कोरली प्रतिमा !
अनंत अंबानीने गिफ्ट केली २ कोटीची घड्याळे !
जम्मू काश्मीरमध्ये हिंदू यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला
लाल दिवा लावलेली पूजा खेडकरची गाडी जप्त !
या प्रकरणी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच संभाजी राजे यांच्याशीही बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक गडावरचं अतिक्रमण हटवून त्याचा ऐतिहासिकपणा आणि पावित्र्य जपण्याचा शासनाचा देखील तसाच प्रयत्न आहे. विशाळ गडावर झालेल्या दगडफेकीची योग्य ती तपासणी करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.