23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषमागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील रस्ता खचला

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील रस्ता खचला

मुसळधार पावसामुळे दुर्घटना

Google News Follow

Related

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईसह उपनगरात चांगलीच हजेरी लावली आहे. ठाणे, नवी- मुंबई, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, पालघर, वसई- विरार शहरांमध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून काही ठिकाणी संरक्षण भिंत कोसळल्याची माहिती आहे. दरम्यान, बोरिवलीमधील एका मेट्रो स्टेशननजीकचा भाग खचल्याचे दिसून आले आहे.

‘न्यूज डंका’ने मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचतोय याची व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच केला होता. रविवारीच झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील मेट्रो म़ॉलच्या बाजूचा रस्ता बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइडपासून खचला होता. या कारणामुळे वाहतुकीची एक बाजू बंद करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री पुन्हा वरुणराजाने जोरदार बॅटीग केली. जोरदार झालेल्या पावसामुळे हा रस्ता पुन्हा एका बाजूने खचून झुकला. सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद केला आहे. यामुळे सकाळी येणाऱ्या वाहनचालकांना, कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना भयंकर त्रासाचा सामना करावा लागत आहे.

बोरिवलीमधील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील रस्त्याचा भाग आज, बुधवारी सकाळी पुन्हा चला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जवळच मेट्रो स्थानकात जाण्यासाठी पायऱ्या असल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय पश्चिम द्रुतगती मार्गही त्याला लागून असून या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते.

हे ही वाचा:

रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण

समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ बांधकाम सुरू असून दोन दिवसांपूर्वी पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून लागतचा रस्ता बंद करण्यात आला. मात्र, या परिसरात मोठ्या संख्येने ऑफिसेस आहेत. रस्ता बंद केल्यामुळे या भागातील नागरिकांना आणि ऑफिसेसमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व वाहनांना प्रवेश बंदी केल्यामुळे मुसळधार पावसात आणि चिखलात लोकांना वाट काढत यावं लागत आहे. त्यातच रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाचं आता रस्त्याचा आणखी एक भाग खचल्यामुळे लोकांना आणखी काही दिवस मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसात अशा घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा