भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन शिर्डीमध्ये घेतल्यामुळे मला अतिशय आनंद आहे. साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला आहे. भाजपामध्ये हा मंत्र महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि शेवटी मी म्हणजे सबुरी आहे. ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या. गेल्या वर्षात अशी कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. ‘जी २०’ असते, ‘जी ७’ असते, त्याप्रमाणे भाजपाचे ‘जी ६’ तयार झाले आहे. म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले, त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगढ, हरियाणा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.
हे ही वाचा :
महाकुंभात पोहोचल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी, स्वामींनी नवे नाव आणि गोत्रही दिले.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्राच्या विजयाने पवारांचे दगा फटक्याचे राजकारण गाडले !
मुख्यमंत्री योगींचा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ़ फैज़ला अटक!
लोकसभेत काठावर पास झालो. मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जे प्रयत्न केले, विश्वास तयार केला आणि त्यामुळे विधानसभेत २८८ पैकी २३७ जागा जिंकून इतिहास रचत ८२ टक्के गुण मिळविले आणि भाजपाने ८९ टक्के गुण मिळवीले आणि मिरीटमध्ये भाजपा पास झाला.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सत्ताधारी पक्षाला सर्वात जास्त २२२ जागा मिळाल्या होत्या. तोही रेकॉर्ड तोडून २३७ जागा आपल्याला मिळाल्या. महाभारताच्या लढाईनंतर पांडवांना विजय मिळाला. निवडणुकीच्या युद्धात लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता त्यामध्ये पार्थाची भूमिका किंवा केशवाची भूमिका तुम्ही सर्वांनी निभावली आहे. तुम्ही केशव होतात आणि मोदी माधव हे माधव होते. त्यामुळेच हा विजय मिळाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.