महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल तीन वर्षानंतर हा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात निलेश बर्वे हा राज्यात प्रथम आला आहे. तर गणेश यलमार हा राज्यात दुसरा आला आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहच वातावरण दिसून आल आहे.
तब्बल तीन वर्षांनी एमपीएससीचा निकाल लागला आहे. यशस्वी झालेल्या विद्यार्थी गुलाल उधळत बँजोच्या तालावर नाचत हा आनंद साजरा करत आहेत. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातील निलेश विलास बर्वे हे राज्यातून प्रथम आला आहे तर अहमदनगर येथील विजय रंगनाथ सैद हे मागासवर्गवारीतून प्रथम आला आहे. तसेच महिलांमधून कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रिया मारुतीरावण ही राज्यात प्रथम अली आहे.
पुणे शहरात निकालानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. राज्यात दुसरा आलेला गणेशशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे. गणेश म्हणाला, “तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमचा निकाल लागला आहे. मी राज्यात दुसरा आलो असून याचा मला खूप आनंद होत आहे. २०१८ साला पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आणि पहिल्याच परीक्षेत मला यश मिळाले आहे. ”
हे ही वाचा:
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
बायज्यूजकडे फिफा फुटबॉल विश्वचषकाचे प्रायोजकत्व
‘बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, शरद पवार नगर म्हणून ओळखणार’
पाकिस्तानची वाटचाल मध्यावधी निवडणुकांच्या दिशेने?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा २०१९ चा निकाल कोरोना महामारीमुळे रखडला होता. राज्यातील अनेक छोट्याश्या गावातून विद्यार्थी पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अनेक वर्ष अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या कष्टाच फळ मिळत.