जय श्री राम: पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये हाती घेतलेला संकल्प अखेर पूर्ण!

छायाचित्रकार महेंद्र त्रिपाठी यांच्या फोटोतून माहिती उघड

जय श्री राम: पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये हाती घेतलेला संकल्प अखेर पूर्ण!

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याची तयारीही जोरदार सुरु आहे.या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी गर्भगृहात केवळ पाच लोक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) उपस्थित राहणार आहेत.

या सगळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची काही जुनी छायाचित्रे आणि त्यांच्या एका संकल्पाची गोष्टही समोर आली आहे.पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये अयोध्येला भेट देऊन प्रभू रामांचे दर्शन घेतले होते आणि पंतप्रधान मोदींनी त्यावेळी हाती घेतलेला संकल्प आता पूर्ण झाल्याचे दिसत आहे.छायाचित्रकार महेंद्र त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे त्यावेळी काढलेल्या फोटोतून ही माहिती उघड झाली आहे.

छायाचित्रकार महेंद्र त्रिपाठी हे त्यावेळी बाबरी इमारतीच्या आत त्यांचा फोटो स्टुडिओ चालवत असत. त्यांनी बाबरी रचनेतील अनेक महत्त्वाची छायाचित्रे घेतली, जी नंतर पुरावे आणि कागदपत्रे बनली. ही छायाचित्रे इतकी महत्त्वाची ठरली की केवळ महेंद्र त्रिपाठी बाबरी विध्वंस प्रकरणात सीबीआयचे साक्षीदार म्हणून राहिले नाहीत, तर त्याच काळात झालेल्या उत्खननाची छायाचित्रेही एएसआयने पुरावा म्हणून सादर केली.

हे ही वाचा:

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा जन्मदिवस आता ‘राज्य क्रीडा दिन’

बाबरांच्या जवळच्या लोकांच्या भीतीने विरोधकांची पळापळ!

जय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार

भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ऊर्जा विभागाला पूर्ण सहकार्य

महेंद्र त्रिपाठी म्हणतात, आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जानेवारी १९९२ रोजी रामभक्त म्हणून अयोध्येत आले होते. त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत बाबरी रचनेत रामललाचे दर्शन घेतले होते.महेंद्र त्रिपाठी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद मोदी रामलल्लाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत काही तरी बोलत होते. त्यावर मी त्यांना विचारले की, ते पुन्हा कधी येणार आहेत.यावर मोदींनी राम मंदिर बांधल्यावरच येणार असल्याचे सांगितले.


यानंतर मंदिराच्या पायाभरणीच्या वेळी ते आले. त्यानंतर ते पुन्हा एकदा रामभक्त म्हणून येत आहेत. हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे आहे. त्यांनी घेतलेला संकल्प आता पूर्ण होणार आहे. यासोबतच मंदिर आंदोलनादरम्यान कर्फ्यूमध्ये अयोध्या पूर्णपणे बंद असताना उमा भारती मुंडन करून अयोध्येत पोहोचल्या होत्या.ते चित्रही अयोध्या आंदोलनाची कहाणी सांगते. तत्कालीन शिवसेनेचे आमदार पवन पांडे यांचे देखील त्यावेळीचे चित्र आहे.तसेच बाबरी पाडल्यावर बाबरीचा इतिहास लिहिला गेलेला एक दगड होता.तो देखील उखाडून टाकल्याचे छायाचित्र आहे.

दरम्यान, या गोष्टी इतिहासजमा झाल्या असतील पण छायाचित्रकाराच्या खोलीत टिपलेले क्षण खूप महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान मोदींसाठी हे विशेष असेल, कारण १९९२ च्या चित्रापासून ते २०२४ च्या श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या चित्रापर्यंतचा एक मोठा प्रवास उघड होतो.

 

 

Exit mobile version