‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच चर्चेत आले होते. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या येऊ घातलेल्या नव्या सिनेमाच्या तारखेची घोषणा केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या सिनेमाची घोषणा केली होती. त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अग्निहोत्री यांनी तो टीझर प्रदर्शित केला असून त्याला प्रेक्षकांचा,नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काहींनी अग्निहोत्री यांच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘द व्हॅक्सीन वॉर’ या सिनेमाचा टीझर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अग्निहोत्री यांनी तो टीझर प्रदर्शित केला असून त्याला प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.विवेक अग्निहोत्री यांच्या या प्रोजेक्टसाठी लोकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. टीझरसोबत दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
DATE ANNOUNCEMENT:
Dear friends, your film #TheVaccineWar #ATrueStory will release worldwide on the auspicious day of 28th September 2023.
Please bless us. pic.twitter.com/qThKxTjPiw— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 15, 2023
गेल्या वर्षी ‘द काश्मीर फाईल्स’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात काश्मीरच्या खोऱ्यातील कश्मिरी पंडितांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली तसेच त्यांना हाकलण्यात आले याविषयी कथा काश्मीर फाईल्समध्ये मांडण्यात आली होती. ‘द व्हॅक्सीन वॉर’मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी नव्या विषयाला हात घातला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा !
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
देशातील डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी कोविडच्या काळात कशाप्रकारे काम केले, त्यांना कोणकोणत्या संघर्षांचा सामना करावा लागला, त्यांनी व्हॅक्सीनची निर्मिती कशी केली याविषयीची मांडणी या चित्रपटातून करण्यात येणार आहे. या चित्रपटातून भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या प्रवासाविषयी सांगण्यात येणार आहे.