24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषराष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !

राष्ट्रवादीत फुटीचे कारण म्हणजे ईडीची कारवाई, शरद पवार !

माविआमध्ये एकी ,कोणताही संभ्रम नसल्याचे शरद पवारांचे व्यक्तव्य

Google News Follow

Related

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह भाजपशी हातमिळवणी केली.राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत गेल्याचे अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात आले. अजित पवारांच्या पक्ष फुटी नंतर शरद पवार गटाकडून मौन पाळण्यात आले होते.ईडीच्या कारवायांच्या धाकानेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचं बोललं जात होतं. यावर शरद पवार यांनी ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतुन काही कारणांमुळे शिंदे गट बाहेर पडला आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यानंतर राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपशी हातमिळवणी केल्याचे अजित पवार गटांकडून वारंवार सांगण्यात आले.राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर शरद पवार यांनी मौन पाळलं होतं. मात्र, ईडीच्या कारवायांच्या धाकानेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचं बोललं जात होतं. यावर ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. बारामती मध्ये मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.तसेच जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

ते म्हणाले, जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलं आहे. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असं सांगतानाच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या गटावर दहशतवादी हल्ला

श्रीनगरमध्ये शालेय विद्यार्थी तिरंगामय !

इंडिया आघाडीची ३१ ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वत:, उद्धव ठकारे आणि नाना पटोले यांनी घेतली. आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसने त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कालच्या ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेली घटना तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडणे म्हणजे अत्यंत दुर्दैवी असल्याचे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्र सरकारवर टीका केली. मणिपूर हा विषय मणिपूरपर्यंत मर्यादित नाही. पूर्व पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर चिंतेची गोष्ट आहे. आम्ही संसदेत हा विषय मांडला. पण यावर चर्चा होऊ दिली नाही. आम्ही एका कलमाखाली चर्चेची मागणी केली. ती पूर्ण केली नाही. पंतप्रधान संसदेत मणिपूरवर बोलले. पण ते मणिपूरवर अत्यंत कमी वेळात बोलले. मणिपूरच्या लोकांना दिलासा देण्यासाठी जी सक्तीने भूमिका घेण्याची गरज होती. ते काहीच दिसलं नाही. त्यांच्या भाषणात त्याचा अभाव होता. त्यातून काही पदरात पडलं नाही, असं ते म्हणाले.

काँग्रेस ने काही केले नाही मग तुम्ही काय केले ?
तुमच्या हातात नऊ वर्ष राज्य आहे. नऊ वर्षात तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही ३० वर्षापूर्वी काय झालं सांगता. ३० वर्षापूर्वीचं वर्कींग असतं. ते संपलं. आज त्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे. मणिपूरला भाजपचं राज्य आहे. काँग्रेसने चांगलं काम केलं नाही म्हणून भाजपला संधी दिली. पण तुम्हाला ९ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

नवाब मलिक बाहेर आल्यावर त्यांच्याशी संवाद साधू
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होऊन दीड वर्षानंतर ते तुरुंगामधून बाहेर पडणार आहेत.यावर शरद पवारांनी सांगितले, मलिकांच्या कुटुंबाशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला, आता नवाब मलिक आज तुरुंगातून बाहेर पडणार आहेत त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा