24 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषउदयपूरच्या स्फोटाचे कारण अखेर आले समोर

उदयपूरच्या स्फोटाचे कारण अखेर आले समोर

राजस्थान पोलीसांनी ह्या मागचे धक्कादायक कारण शोधून काढले

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात झालेल्या उदयपूर अहमदाबाद स्फोटाच्या योजनेला यशस्वी बनवण्याऱ्या आरोपीचे खरे कारण आता समोर आले आहे. अश्या दहशतवादी स्फोटानंतर धूलचंद ह्याला पकडण्यात आले आणि राजस्थान पोलीसांनी ह्या मागचे धक्कादायक कारण शोधून काढले आहे. ह्या ट्रेनचे उदघाटन पंतप्रधान मोदी ह्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी केले होते.

गुरुवारी उघड झाले की, ३२ वर्षीय धूलचंद ह्याने रेल्वे आणि खाण कंपनी हिंदुस्तान झिंक यांच्या विरोधात आपली भरपाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. वडिलोपार्जित ७० बिघा जमिनीचा मोबदला ना दिल्याचा रागाने त्याने हे सर्व घडवून आणलं . आरोपींचा कोणाचाही खून करण्याचा हेतू नव्हता, असे पोलिसांनी प्राथमिक तपासातील निष्कर्षानुसार सांगितले. एकलिंगपुरा येथील रहिवासी धूलचंद मीना, १८ वर्षीय सहकारी संशयित प्रकाश मीणा आणि १७ वर्षीय दुसरा मुलगा यांना ताब्यात घेतले. विशेष ऑपरेशन ग्रुप, दहशतवादविरोधी पथक आणि उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा केला. पोलिसांनी नंतर अंकुश सुवाल्का नावाच्या चौथ्या संशयिताला ताब्यात घेतले, ज्याला स्फोटात वापरलेली स्फोटके धुलचंदला विकल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

शास्त्रज्ञाला दिली शिरच्छेदाची धमकी

फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे कंपन्यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

ऍमेझॉन कंपनी करणार कर्मचारी कपात ?

फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 

अतिरिक्त पोलीस महासंचालक (डीजीपी ) अशोक राठोड यांनी सांगितले की, धूलचंद आणि त्याच्या साथीदारांनी शनिवारी संध्याकाळी ५:३० नंतर नव्याने दाखल झालेल्या उदयपूर-असरवा इंटरसिटी एक्स्प्रेस नेहमीच्या मार्गावरून गेल्यानंतर ओढा रेल्वे पुलावर स्फोटके पेरली. ओढा पूल हा उदयपूरपासून किमान ३५ किमी अंतरावर आहे. ” धुलचंद २०१७ पासून रेल्वे आणि हिंदुस्तान झिंकने संपादित केलेल्या कौटुंबिक जमिनीच्या विरोधात भरपाई आणि रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत होता. आम्हाला आतापर्यंत काय माहित आहे याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला नुकसानभरपाईशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे, यासह जर आरोपीचा दुसरा काही हेतू असेल तर तो हो शोधावा लागेल “, असे डीजीपी म्हणाले.

तपासावर अधिकृत निवेदनानुसार, रेल्वे आणि हिंदुस्थान झिंकने १९७० ते १९८० च्या दशकात धूलचंद यांच्या कुटुंबाची जमीन ताब्यात घेतली होती. पोलिसांनी सांगितले की तो आणि सह-आरोपी बाईकवरून स्फोटाच्या ठिकाणी गेले आणि जिलेटिन पेरले, हा पदार्थ सामान्यतः त्या भागात असलेल्या खाणींमध्ये ब्लास्टिंगसाठी वापरला जातो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा