22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेष‘द रेल्वे मेन’चा जगभरात धुमाकूळ!

‘द रेल्वे मेन’चा जगभरात धुमाकूळ!

नेटफ्लिक्सची सिरीज ३६ देशांमध्ये ट्रेन्ड

Google News Follow

Related

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित असलेली ‘द रेल्वे मेन’ ही सिरीज लोकप्रिय झाली आहे. नेटफ्लिक्सवर आलेल्या या सिरीजला भारतातच नव्हे तर परदेशातही भरपूर लोकप्रियता मिळते आहे.

१८ नोव्हेंबरला सुरू झालेली ही सिरीज दुसऱ्या आठवड्यातही गैरइंग्रजी टीव्ही यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, ही सिरीज ३६ देशांमध्ये ट्रेंड करते आहे. या सीरिजचे दिग्दर्शन करणाऱ्या शिव रवैल यानेही याबाबत आनंद व्यक्त केला आहे. ‘द रेल्वे मेन साकारणे हा एक भावनिक प्रवास होता. या सिरीजच्या माध्यमातून साहसपूर्ण, आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या गोष्टींना मला प्रेक्षकांसमोर आणायचे होते. वायएफने माझ्या प्रोजेक्टला समर्थन देणे आणि मला माझी गोष्ट सांगण्याची संधी देणे माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक होते.

हे ही वाचा:

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची पुन्हा धुरा

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा भाऊ आणि वडील अटकेत

नेटफ्लिक्सही आमच्या या प्रवासात सहभागी झाल्याने मी खूप खूष झालो. त्यामुळे ‘द रेल्वे मेन’ची गोष्ट जगभरातील लोकांपर्यंत पोहोचू शकली. जगभरातील लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून आणि ३६ देशांमध्ये ही मालिका ट्रेंड होत असल्याचे पाहून मला अत्यानंद झाला आहे. ही सिरीज शौर्य आणि साहसाचे सार्वभौमत्व दर्शवते. संपूर्ण टीम यामुळे खूष झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक शिव रवैल यांनी दिली.

आर माधवन, केकेचा अप्रतिम अभिनय
सत्य घटनेवरून प्रेरित ‘द रेल्वे मेन’ मानवतेच्या अदम्य भावना व्यक्त करते. आर माधवन, के. के. मेनन, दिव्येंदू यांनी यात कसदार अभिनय केला आहे. ‘द रेल्वे मेनचा एक घटक होणं हे केवळ त्यात एक भूमिका करण्याइतपत मर्यादित नव्हतं. तर, आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक अज्ञात व्यक्तींना ही श्रद्धांजली होती,’ अशी प्रतिक्रिया आर. माधवन यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा