ईडीने सोमवारी झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांच्या मदतनीसाच्या नोकराच्या घरी धाड टाकत तब्बल ३४.२३ कोटी रुपये इतकी रोकड जप्त केली होती.आज पुन्हा ईडीच्या पथकाने झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे.ईडीच्या पथकाने राजीव कुमार सिंग नावाच्या कंत्राटदाराकडून सुमारे दीड कोटी रुपये जप्त केले आहेत.
झारखंडमध्ये ईडीचे छापे आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्याचे काम सुरू आहे. सोमवारच्या शोध मोहिमेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारीही रांचीमध्ये पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.सोमवारी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये सुमारे ३५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. याच प्रकरणी ईडीच्या पथकाने आज कारवाई केली.ईडीने कारवाई करत राजीव कुमार सिंग नावाच्या कंत्राटदाराकडून सुमारे दीड कोटी रुपये जप्त केले आहेत.राजीव कुमार सिंगच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपास यंत्रणेने सांगितले. ईडीच्या पथकाकडून कारवाई सुरूच आहे.
हे ही वाचा:
‘दहशतवादी कसाबची बाजू घेऊन काँग्रेसकडून शहिदांचा अपमान’
बुरखा घालायला नाही म्हटल म्हणून केस कापले !
दिव्यांगांची सहल; शिरगाव किल्ला, केळवा बीचची केली सफर
अरविंद केजरीवालांचा मुक्काम २० मे पर्यंत तुरुंगातचं!
दरम्यान, ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल आणि यांचा नोकर जहांगीर याला ईडीच्या पथकाने अटक केली आहे.या प्रकरणी पथकाचा तपास सुरु आहे.