उद्धव ठाकरेंना बांगलादेशातील हिंदुंबद्दल कणव, मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी

उद्धव ठाकरे यांची मागणी

उद्धव ठाकरेंना बांगलादेशातील हिंदुंबद्दल कणव, मोदींनी लक्ष घालावे अशी मागणी

बांगलादेशमध्ये हिंदुंवर जे अत्याचार होत आहेत, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका फोनवर युक्रेन युद्ध थांबवू शकतात तर बांगलादेशमध्ये हिंदुंवर होणारे अत्याचार का थांबवत नाहीत असा सवाल ठाकरे यांनी यावेळी विचारला.

ठाकरे म्हणाले, बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तिथे इस्कॉनच्या प्रमुखांना अटक करण्यात आली. मंदिर सुरक्षित नाहीत. भारतातसुद्धा मंदिरे सुरक्षित नाहीत. दादरमध्ये हमालांनी ८० वर्षांपूर्वी बांधलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर भर देऊ लागले आहेत. त्यांनी यानिमित्ताने पुन्हा हिंदुत्वाची कड घेण्यास सुरुवात केली आहे. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे. इलेक्शन पुरतं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाहीत. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होतं का? यांचं हिंदुत्व मतांपुरतं आहे. हिंदुंची मते हवीत.

हेही वाचा..

प्रार्थनास्थळांना आव्हान देणारे नवे खटले दाखल होणार नाहीत!

बांगलादेशात तलवारीच्या धाकावर केलं जातंय धर्मांतर

एएमयूमधील बांगलादेशी विद्यार्थ्यांकडून भारत आणि महिलांबद्दल अपशब्द!

वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा

या संदर्भात आमच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली होती मात्र त्यांनी दिली नसल्याने हा विषय पत्रकार परिषदेत मांडल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version