महात्मा गांधी महान होते. परंतु त्यांना जगभरात कोणीही ओळखत न्हवते.जेव्हा पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट आला तेव्हा जगभरातील लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.या अगोदर महात्मा गांधींना कोणीही ओळखत न्हवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.महात्मा गांधींचे विचार जगासमोर पोहोचवण्यासाठी ७५ वर्षात आपण काहीही केले नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “महात्मा गांधी हे महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कल्पना आपण जगाला सांगायला हव्या होत्या, ही आमची जबाबदारी होती. मात्र, त्यात आपण अपयशी ठरलो.गांधींना कोणी ओळखत नव्हते. जेव्हा महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण होते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही ७५ वर्षांत काहीही केले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांची जगभरात ओळख आहे.महात्मा गांधी यांच्या पेक्षा काही कमी न्हवते.मी जगभर फिरलो आहे. मात्र, गांधी किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी मान्यता मिळायला हवी होती ती मिळाली नाही. आज जगाच्या अनेक समस्यांच्या समाधानात गांधी आहेत.आपण खूप काही गमावले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री शिंदेंविरोधातला ‘रोखठोक लेख’ राऊतांना भोवणार!
‘आप’ने झटकले हात, “काँग्रेससोबतची आमची युती कायमची नाही!”
ब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित
पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी जर्मनीहून येणार पुण्यात!
#PMModiOnABP | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने @ABPNews को दिए खास इंटरव्यू में महात्मा गांधी को लेकर जो बात कही, उसका पूरा संदर्भ जानने के लिए आपको ये वीडियो देखना चाहिए. pic.twitter.com/E6kHvJk6vD
— ABP News (@ABPNews) May 29, 2024
राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशात कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. सगळीकडे शांतता होती. ही शांतता एकतर्फी नव्हती. सर्वांना याचे श्रेय जाते.जेव्हा राम मंदिर समर्पण सोहळा झाला तेव्हा बाबरी मशिदीसाठी लढणारे इक्बाल अन्सारी देखील उपस्थित होते. हा आपला भारत आहे. मात्र, आम्ही त्याचे मार्केटिंग करत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पूर्वी काँग्रेस आणि अखिल भारतीय नेते निवडणुकीच्या वेळी मंदिरात जायचे.मात्र, ते आता मंदिरात जाताना दिसत नाहीत. एवढेच नाही तर या निवडणुकीत एकही नेता इफ्तार पार्टीला गेला नाही.कारण मोदीने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, जे बरोबर आहे तेच करायचे.यांच्यावर दबाव वाढला आहे.त्यांना सर्व वाईट कामे आणि लोकांनां मूर्खबनवण्याचे काम सोडावे लागत आहे. मतांसाठी असे राजकारण करून चालणार नाही, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे.