व्हीयआपींचा वाढला भाव, त्र्यंबकेश्वरा आता धाव!

व्हीआयपी रांगेवरून कित्येक मंदिरात वाद

व्हीयआपींचा वाढला भाव, त्र्यंबकेश्वरा आता धाव!

मंदिरात आपण तासन तास रांगेत उभे ताटकळत बसलोय आणि आपल्या समोरील रांग पुढे पटापट सरकते आहे. मंदिर प्रशासन आपण उभे असलेल्या दर्शन रांगेला अडवून, टाककळत ठेवून समोरील देणगी भरून आलेल्या भाविकांना मोकळी वाट करून देतेय. हे तुम्हाला पटतंय का? नाही ना. मग एवढे दिवस आपण हे सहन कसे करतोय. अनेक मंदिरांमध्ये हे चित्र दिसते. यावर आवाज उठवला का जात नाही, हे कसे झाले कानामागून आले आणि दर्शन घेऊन गेले, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.

या व्हीआयपी रांगेवरून कित्येक मंदिरात वाद निर्माण झाले. पण याला कोणत्याही मंदिर प्रशासनाने दाद दिली नाही. त्यांची दंडुकेशाही सुरूच राहिली. त्र्यंबकेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराpaidच्या पेड दर्शनावरून वाद निर्माण झाला, विरोध करण्यात आला. या पेड दर्शनाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली. परंतु आजही या मंदिरात पेड दर्शनासाठी २०० रुपये आकारले जाताहेत हे विशेष.

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, रांगेत दीर्घकाळ उभे राहावे लागू नये, यासाठी देवस्थानने २०० रुपये प्रतिव्यक्ती अशा देणगी दर्शनाची व्यवस्था केली. यामुळे गेले कित्येक वर्ष त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी महादरवाजाचा भाविक उपयोग करायचे. आता या २०० रुपयावाले धनदांडग्यांसाठी, वेळ नसलेल्या भाविकांना हा मुख्य दरवाजा बहाल केला गेला आहे. या व्हीआयपी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे सामान्य भाविकांची दर्शन लाइन ही मंदिराच्या मागील बाजूने केलेली आहे. ती भरपूर दूर असल्याने वयस्कर, अपंग भाविकांसाठी त्रासाची बनली आहे. व्हीआयपी रांगेला प्राधान्य दिल्यामुळे या रांगेला पाच ते सहा तासांची अवधी लागतोय आणि तो त्रासाचा होतोय. यामुळे भाविक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हा वाद उफाळून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन रांग तात्काळ बंद करून सर्व भाविकांना समान वागणूक देत रांगेतच कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता दर्शन घेण्याची सक्ती करावी, अशी मागणी होताना दिसत आहे.

भक्ती पण पैशाच्या जोरावर विकत घेण्याची सुविधा भगवंतानेचे निर्माण केली आहे दुसरं काय. बाकी या प्रचंड मोठ्या मंदिरापेक्षा एखाद्या खेडेगावातल्या छोट्याशा स्वच्छ आणि प्रसन्न देवळात मनाला जास्त उभारी येते. बाकी देव काय चराचरात आहे नाही का?? अशी प्रतिक्रिया मकरंद चितळे यांनी दिली आहे.

व्हीआयपी दर्शनामुळे देवाच्या दारात गरीब श्रीमंत भेद निर्माण होतोय. देव कधी म्हणालाय का, ५०० रुपये जो भरेल तो पहिला, २०० रुपये देईल तो दुसरा आणि कोणी पैसेच भरणार नाही त्याला ठेवा ताटकळत. देवाला सर्व भाविक हे सारखेच असतात मग यात भेदभाव करणारे हे कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय. हे व्हीआयपी दर्शन महाराष्ट्रातील कित्येक मंदिरात सुरू आहे आणि यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही.

गरोदर महिला, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींसाठी पेड पास उपयुक्त ठरत असल्यामुळे पेड पास ही सोय फक्त त्यांच्यासाठीचं सीमित ठेवायला हवी. मात्र, इतर भाविकांना सर्वांसोबतचं दर्शन द्यायला हवे. देवळात येणाऱ्या प्रत्येकाला विशेष पास घेऊन दर्शन घेणं शक्य नसतं आणि या सुविधेमुळेचं इतर सर्वसामन्यांना दर्शन घ्यायला विलंब होतो, असे मनाली सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा :

माहीमची ती अनधिकृत मजार अर्ध्या तासात हटविली

कमालच झाली! आनंदी देशांच्या यादीत भारतापुढे पाकिस्तान, श्रीलंका, युक्रेन

आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी

संजय राऊत यांचा पत्ता कट… आता राज्यसभेतील मुख्य नेते गजानन कीर्तीकर

दर्शनासाठी भाविक कित्येक मैल प्रवास करून दर्शासाठी येत असतात. तास न तास प्रवास करून दर्शन रांगेसाठी भाविक उभे राहतात. मात्र पेड पास घेऊन काही जण थेट मंदिरात जात असतील, तर हे चुकीचे असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. हे व्हीआयपी दर्शन महाराष्ट्रातील कित्येक मंदिरात सुरू आहे. हे तात्काळ बंद करून सर्वांना समान वागणूक मिळावी, अशी मागणी होताना दिसत आहे.

हे त्या त्या मंदिराचा प्रश्न आहे, परंतु हे योग्य नाही. देणगी मूल्य घेऊन त्यास दर्शनाला नेणे ही तात्कालिक सोय आहे. परंतु देवाला दर्शनाला जात असताना आपण व्हीआयपी आहात असा भाव मनात असणे चुकीचं आहे. पैसे दिले कि काय पण करता येते ही भावना बळावत आहे, असे जयवंत नाईक यांचं म्हणणं आहे.

या पटापट दर्शन करून झालं की हुश्श म्हणणाऱ्यांसाठी एक ओळ आठवतेय ती अशी… मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव देव अशानं, भेटायचा नाही हो। देव बाजारचा भाजीपाला नाही हो॥.

Exit mobile version