इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!

जितेंद्र नारायण त्यागींचे आवाहन

इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!

मुस्लीम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या जितेंद्र नारायण त्यागी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देण्याची घोषणा जितेंद्र त्यागी यांनी केली आहे. तसेच त्यांना व्यवसाय मिळवून देण्यातही मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाकुंभ मेळ्यात सहभागी होत त्यांनी आज (११ फेब्रुवारी)  संगमात स्नान केले आणि ही घोषणा केली.

जितेंद्र नारायण त्यागी म्हणाले की, आज संगममध्ये स्नान केल्यानंतर खूप आनंद होत आहे. या पवित्र भूमीवरून मी संपूर्ण देशातील मुस्लिमांना सनातन धर्मात परतण्याचा विचार करण्याची विनंती करतो. माझ्या मित्रांच्या माध्यमातून अशी एका संघटना स्थापन करत आहे, ज्या संघटनेद्वारे जे मुस्लीम कुटुंब सनातन धर्मात परत येतील त्यांना दरमहा ३ हजार रुपये दिले जातील. सनातन धर्मात पूर्णपणे स्थिर होईपर्यंत त्यांना ३ हजार रुपये दिले जातील. तसेच ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना व्यवसायात मदत केली जाईल.

मुस्लिमांना आवाहन करत ते म्हणाले, तुम्हाला कट्टरपंथी आणि जिहादी मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. सनातन धर्मात आनंदाने या सनातन धर्म तुमचे स्वागत करतो.

हे ही वाचा : 

तंत्रज्ञान नोकऱ्या हिसकावून घेत नाही, रोजगाराचे स्वरूप बदलते

उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुलाचे धर्मांतर करून लग्न लावण्याप्रकरणी मौलवीसह पाच जणांना अटक!

मुस्लिम जमावाकडून तस्लिमा नसरीन यांच्या पुस्तक विक्री स्टॉलची तोडफोड

वांद्रे येथे वयोवृद्ध महिलेची घरात हत्या, आरोपी शरीफ अली शेखला काही तासांतच अटक

दरम्यान, उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ३ वर्षांपूर्वी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर वसीम रिझवी हे जितेंद्र नारायण त्यागी बनले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी हे नाव दिले होते.

Exit mobile version