29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषमुस्लीम समाजाची लोकसंख्या १४ वरून ४० टक्यांवर !

मुस्लीम समाजाची लोकसंख्या १४ वरून ४० टक्यांवर !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून चिंता

Google News Follow

Related

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उत्तर-पूर्व सीमावर्ती राज्यातील बदलत्या लोकसंख्येच्या रचनेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लोकसंख्येतील बदल हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले. हा राजकीय मुद्दा नसून त्यांच्यासाठी हा जीवन आणि मरणाचा मुद्दा असल्याचेही त्यांनी सांगितले. झारखंडच्या रांचीमध्ये ते बोलत होते.

सरमा यांनी गेल्या काही दशकांमध्ये आसाममध्ये लोकसंख्याशास्त्रीय रचना कशी आमूलाग्र बदलली आहे यावर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की १९५१ मध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १२-१४ टक्के मुस्लिम होते ते आता ४० टक्केपर्यंत पोहोचले आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेक जिल्हे गमावले असल्याचे ते म्हणाले. सरमा म्हणाले, लोकसंख्या बदलणे ही माझ्यासाठी मोठी समस्या आहे. आसाममध्ये आज मुस्लिम लोकसंख्या ४० टक्क्यांवर पोहोचली आहे. १९५१ मध्ये ते १२ टक्के होते. ते पुढे म्हणाले, आम्ही अनेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही. हा माझ्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे.

हेही वाचा..

सुरतमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, २० कोटींचा कच्चा माल जप्त !

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा चकमक; लष्कराचे दोन जवान जखमी

हाथरस चेंगराचेंगरीवर भोले बाबा म्हणतो, मृत्यू अटळ आहे, ‘आज ना उद्या मरायचे आहे’

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !

सरमा हे आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी आहेत. त्यांनी जेएमएमच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारला आदिवासी मुलींना अडकवून त्यांच्याशी लग्न करणाऱ्या ‘बेकायदेशीर स्थलांतरितां’ (घुसपटीये) विरोधात कठोर कारवाई न केल्याबद्दल निषेध व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की प्रशासन योग्य परिश्रम करत नाही आणि आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करत नाही. सत्तेत आल्यानंतर भाजप घुसखोर आदिवासी मुलींना अडकवू नये आणि कोणीही त्यांचे शोषण करू शकणार नाही याची खात्री करण्यासाठी कायदे तयार करेल.

झारखंडमध्ये बाहेरून अवैध स्थलांतरित येऊन आदिवासी मुलींना आमिष दाखवण्याची समस्या आहे. हे सर्व झामुमो-काँग्रेसच्या संरक्षणात होत आहे. आसाम हे सीमावर्ती राज्य आहे. मी रोज घुसखोरांशी लढतोय, झारखंड सरकारने या प्रकरणी हार का पत्करली? असा सवाल त्यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा