24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष'महाराजा'चा रुबाब वाढतोय

‘महाराजा’चा रुबाब वाढतोय

एअर इंडिया आपल्या विमानांच्या केबिनमध्ये बदल करणार

Google News Follow

Related

एअर इंडिया टाटा समूहात दाखल झाल्यानंतर नवनवीन प्रयोग व्हायला सुरुवात झाली आहे. एअर इंडियाची विमाने आता वेळेवर उड्डाण करत आहेत. प्रवाशांच्या सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी ४०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ३००० कोटी रुपयांच्या मदतीने आपल्या विमानांच्या केबिनमध्ये बदल करणार आहे. ४० वाइड बॉडी विमानांचे आधुनिकीकरण करणार आहे. यामुळे विमानांचे आतील भाग अधिक आरामदायी आणि दिसायला आकर्षक दिसतील, असे बनवले जाणार आहेत. एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी २७ बोईंग बी७८७-८ आणि १३ बी७७७ विमानांचे आतील भाग बदलणार आहे. नूतनीकरणाचा भाग म्हणून केबिनचे आतील भाग नवीन असतील.

विमानांची आसनं अधिक आरामदायक

जुन्या आसनांची जागा आता अधिक आरामदायक आणि नवीनतम पिढीची आसनं घेणार आहेत. ही विमाने आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करत असल्याने त्यांच्यामध्ये सर्वोत्तम श्रेणीतील करमणूक देखील असणार आहे. याशिवाय नवीन प्रीमियम इकॉनॉमी केबिनही तयार करण्यात येणार आहे. या सर्व उपायांमुळे प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा होईल.

हे ही वाचा:

अयोध्येतही लवकरच धावणार इलेक्ट्रिक बस

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या आंदोलकाला फाशी

जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलचे सत्य आले समोर

श्रद्धा वालकरचे वडील प्रथमच आले समोर, आफताबच्या कुटुंबियांबाबत केली ही मागणी

प्रीमियम इकॉनॉमी केबिन उपलब्ध असेल

एअर इंडियामध्ये यापुढे प्रीमियम इकॉनॉमी केबिन देखील आणणार आहे. ही केबिन यापूर्वी या विमानात उपलब्ध नव्हती. या केबिनच्या निर्मितीमुळे अशा ग्राहकांना फायदा होईल जे बिझनेस किंवा फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी आपला खिसा खाली करायचा नाही. ते कमी खर्चात प्रीमियम सुविधेचा आनंद घेतील.

बंगलोर ते सॅन फ्रान्सिस्को नॉन स्टॉप फ्लाइट

एअर इंडियाने २ डिसेंबरपासून बेंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्को, यूएसए अशी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू केली आहे. या सेवेचे राऊंड ट्रिपचे सुरुवातीचे भाडे ८३,७६६ रुपये आहे. एअरलाइन्सने एकेरी, राउंड ट्रिपसाठी इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी भाडेही जारी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा