“पोलीस भरती २०२२-२३ ची मैदानी चाचणी प्रक्रिया १९ जून रोजी सर्व पोलीस घटकात सुरु होणार असून त्याबाबतची अधिक माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. त्यावेळी राजकुमार व्हटकर यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध १७ हजार पदे रिक्त होती यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेले आहेत, असे सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले, कारागृह भरतीही आम्ही करत असतो. १ हजार ८०० पदासाठी ३ लाख ७२ हजारहून अधिक अर्ज आलेले आहे. लोकसभा निवडणूकीमुळे ही भरती करण शक्य नव्हतं. मात्र, १९ जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे.
१९ जून पासून भरती प्रक्रियेदरम्यान लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती. दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो.विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही, त्यांना त्यात सुटं देण्यात आलेली नाही, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल!
ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी
मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!
बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’
भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होतं आहेत. ज्या ठिकाणी पाऊस पडत असेल त्या ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल. ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी घेतली जाईल. पारदर्शकपणे आणि मेरिट बेस्ट होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फ्रॉड असे केले जात नाहीत. असे आत्तापर्यंत झालेले नाही आणि महाराष्ट्र पोलीस दलाची ही उज्वल परंपरा ठेवणार आहोत. अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राजकुमार व्हटकर यांनी पुढे सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही आमचे गोपनीय यंत्रनाही मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षा त्याठिकाणी होतो. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी कुठलाही एजंट मला जर कॉन्टॅक्ट करत असेल तर तुम्ही ते स्थानिक घटक प्रमुख आहेत. त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमचे अँटी करप्शन ब्रँच जे लोक आहेत त्यांचे नाव नंबर्स त्या ठिकाणी ठेवलेले असतात आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व उमेदवारांना हे व्हटकर यांच्याकडून सांगण्यात आले की कोणत्याही अमिषाला आपण बळी पडू नका पोलीस भरती ही पूर्णपणे निपक्षपाती आणि पारदर्शकता पद्धतीने आणि मेरिट बेस्ट होणार आहे.
आपल्याला जर कुठला एजंट किंवा असे काही अकादमी, संस्था चालक असतात, ते सुद्धा आपल्याला आश्वासनं देतात आणि पैसे मागतात तसं कोणीही करू नये तसे निदर्शनास आलं तर तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकतात आणि आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू मागच्या वर्षी काही ठिकाणी गैरप्रकार केल्याचे जे निदर्शनास आले होते. त्या सर्वांविरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केले. मागच्या वर्षी मुंबईतून ५७ असे प्रकार उघडकीस आले होते, असल्याची माहिती व्हटकर यांनी दिली आहे.