मध्य प्रदेशातील त्या बलात्कार पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी पोलीस अधिकारी घेणार

उज्जैनमधील महाकाल पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर घेणार जबाबदारी

मध्य प्रदेशातील त्या बलात्कार पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी पोलीस अधिकारी घेणार

मध्य प्रदेशातील उज्जैन बलात्कार प्रकरणानंतर खळबळ उडाली असून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रंक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सोडून दिलं. त्यानंतर, ती मदतीसाठी याचना करत असतानाही तिला कोणी मदत केली नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात माणुसकीचंही दर्शन झालं आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर मदत मागणाऱ्या पीडितेला अनेकांनी मदत करण्यास नकार दिला. पण, त्याच वेळी आश्रमातील एका तरुणाने तिला मदत केली. तिला वस्त्र देऊन तिच्या जेवणाची व्यवस्था केली. तर, दोन पोलिसांनी या मुलीसाठी रक्तदान केले आहे. तर, एका पोलिसाने पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

उज्जैनमधील महाकाल पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर अजय वर्मा यांनी पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. तसेच या मुलीच्या कुटुंबियांची माहिती मिळाली नसती तर तिला आपण दत्तक घेणार होतो, असे ते म्हणाले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्या वेदनादायी किंकाळ्या ऐकून रडू कोसळले होते, असे ते म्हणाले. पीडित मुलीच्या कुटुंबियांचा शोध लागला आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत न अडकता त्यांना मदत करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

पीडित मुलीच्या आर्थिक गरजा, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले. तिचे पालक सापडले नसते तर मी तिला कायदेशीररित्या दत्तक घेतले असते, असंही ते म्हणाले.

प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेज दिसली होते. पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिची शाळा त्यांच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

२४ सप्टेंबरला ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती आणि बेपत्ता झाली, ते पुढे म्हणाले. ती परत घरी न आल्याने तिचा आम्ही सर्वत्र शोध घेतला. तिचा शोध न लागल्याने शेवटी आम्ही २५ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केल्याचे, मुलीच्या वडिलांनी सांगितले. माझ्या काकांनी मला तिचा फोटो दाखवला तेव्हा ती उज्जैनमध्ये असल्याचे कळून आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आले की पीडित मुलगी अर्धनग्न आणि रक्तस्त्राव अस्वस्थेत उज्जैनच्या रस्त्यावरून चालताना दिसण्यापूर्वी ती मुलगी जीवन खेरी येथे एका ऑटोमध्ये बसली होती. या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला शहरातील दांडी आश्रमाजवळ फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ऑटो चालकाला अटक केली असून अन्य तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version