मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

४० प्रवासी विमानाच्या प्रतीक्षेत होते

मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे कायम चर्चेचा विषय असते. विस्कळीत विमानसेवा, कमी विमान फेऱ्या, तांत्रिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवरून हे विमानतळ गेले काही महिने चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच एका अजब घटनेमुळे हे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेलं विमान चिपी विमानतळावर लॅण्ड न होताच पुन्हा मुंबईला परतलं आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबईहून विमानाने सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावर जाण्यासाठी उड्डाण केलं. त्यानंतर चिपी विमानतळावर विमानाने आकाशात दोन वेळा घिरट्या घातल्या आणि मुंबईत माघारी आलं. मात्र, प्रवाशांना न घेताच हे विमान माघारी परतले. चिपी विमानतळावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने विमान पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चिपी विमानतळावर मुंबईला जाण्यासाठी म्हणून ४० प्रवासी विमानाची वाट पाहत होते. विमानाच्या प्रतीक्षेत ४० प्रवासी ताटकळत होते. मात्र, सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा रद्द झाली आणि त्याचा त्रास ४० प्रवाशांना सहन करावा लागला.

हे ही वाचा:

ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम

‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’

“ज्या व्यक्तीने राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला त्या व्यक्तीचा टॅग डोक्यावर लावून घेण्यास हरकत नाही”

चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार विमानसेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आता तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Exit mobile version