बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमानाला अपघात

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

बारामती तालुक्यातील कटफल येथे रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळलं आहे.विमानातील पायलट शक्ती सिंग याना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.विमानाचे ट्रेनिंग देण्याचं काम बारामतीमध्ये देण्यात येत.या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

कटफल इथे वैमानिकांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.अनेक पायलट इथे विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेऊन तयार होतात. गेल्या काही दिवसापासून इथे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. पुणे आणि शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पाहायला मिळतात. आजही असंच ट्रेनिंग सुरु होतं. या ट्रेनिंगदरम्यान कटफलमध्ये विमान कोसळलं. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले आहेत. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी राष्ट्रपतींच्या गावी पोहचणार रेल्वे

इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट

गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय स्थानिक नागरिकही अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त विमान आकाराने छोटं होतं. पण या अपघातामुळे विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. विमानाच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. हा अपघात नेमकं कशामुळे घडला, प्रशिक्षणार्थी पायलटकडून काही चूक झाली का, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Exit mobile version