28 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषफेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची 'जागा'

फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’

Google News Follow

Related

एलिसन फेलिक्स या अमेरिकन महिला खेळाडूच्या खात्यात आज ११ ऑलिम्पिक पदके आहेत. त्यात ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. पण त्यापेक्षाही तिची कहाणी मोठी विलक्षण आहे.

गेल्या पाच ऑलिम्पिकमध्ये ही पदके जिंकताना तिने आपली क्षमता सिद्ध केली खरी, पण त्यापेक्षाही तिने स्वतःचा ब्रँड तयार करत जी झेप घेतली ते कौतुकास्पद होते. त्याचे झाले असे की,  २००४ पासूनच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एलिसनने पदकांची कमाई केली आहे. सध्या तिच्याकडे ११ ऑलिम्पिक पदके आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी महिला खेळाडू म्हणून एलिसनने स्वतःची ओळख बनवली आहे.

२००४ मधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये एलिसनने रौप्य पदकाला गवसणी घातली. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एलिसनने २०० मीटर स्पर्धेत रौप्य आणि ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने २०० मीटर, ४ × १०० मीटर रिले आणि ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने दोन रिले स्पर्धेत सुवर्ण आणि ४०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक आणि ४ × ४०० रिले स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

हे ही वाचा:
प्रदूषणात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला का आहे?

बापलेक बनावट ब्रँडच्या कपड्यात गुंडाळत होते ग्राहकांना

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

जाहिरातींबाबत गणेशोत्सव मंडळांच्या संघर्षाला अखेर आले यश

२०१८ मध्ये एलिसन गरोदर होती. तिच्या गरोदरपणामुळे नाइकी या ब्रँडने तिच्या प्रायोजकत्वाची किंमत ७० टक्क्यांनी कमी केली. तिने याबाबत विचारणा केली असता तिला ‘तुझी जागा जाणून घेण्यास’ सांगितले आणि प्रशिक्षणासाठी जायला सांगितले. या घटनेनंतर एलिसनने नाइकीशी असलेले करार संपवले. तिने स्वतः तिच्या बुटांचा ब्रँड तयार केला.

एलिसन स्वतःच्या बुटांच्या ब्रँडसोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळली. वयाच्या ३५ व्या वर्षी ती तिची पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा खेळली. या स्पर्धेत तिने ४०० मीटर मध्ये कांस्य पदक आणि ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने ११ ऑलिम्पिक पदकांची कमाई केली असून त्यात सात सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे.

या पदकांच्या कमाईनंतर तिने तिच्या पदकांचा आणि प्रसुती वेळीच्या शस्त्रक्रियेची खूण दर्शवणारे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसिद्ध केले आहे. सोबत तिने ‘मला माझी जागा माहित आहे. (आणि ती माझ्या स्वतःच्या बुटांमध्ये आहे)’ असे कॅप्शन लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CSPHJ3CHgA8/?utm_medium=copy_link

परिणामी, ज्या महिला खेळाडूंना स्पॉन्सर केले जाते त्यांना आता गरोदरपणात १८ महिन्यांचे वेतन आणि बोनस याची हमी देण्यात आली आहे. त्यानंतर अजून तीन प्रायोजकांनी त्यांच्या अटी बदलल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा