मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वत्र तारांबळ उडालेली असताना घाटकोपर येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. आता या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून या ठिकाणी होर्डिंग असलेल्या कंपनीचा मालक भावेश भिडे आपल्या संपूर्ण परिवाला घेऊन फरार झाला आहे. त्याच्या विरोधात पंत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भावेश भिडे याचा फोटो व्हायरल झाला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता भाजपा आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि इंगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिडे याचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी यासोबत म्हटले आहे की, “१४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे. उद्धव ठाकरे यांच्या घरात. मनाला चीड आणणारे हे चित्र. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर आजही टक्केवारीसाठी १४ लोकांचा नाहक बळी घेता आहेत. कुठे फेडणार हे पाप?” असे राम कदम यांनी म्हटले आहे.
14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात..
मनाला चीड आणणारे हे चित्र..
त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते
हे या चित्रावरून स्पष्ट होते..
टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर..
आजही टक्केवारी साठी 14… pic.twitter.com/5OGtWxh2Pp
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) May 14, 2024
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या होर्डिंगबाबत तपशील समोर आणले आहेत. या होर्डिंगला १ जानेवारी २०२० ते १ मार्च २०२२ पर्यंत परवानगी आहे. शहाजी निकम यांनी ही परवानगी दिली. ४० फुटांची परवानगी असताना १२० फुटांची परवानगी दिली आहे. याबाबत पोलिसांकडे हरकती नोंदवण्यात आल्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता भावेश हा आपल्या परिवारासोबत पळून गेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
वाराणसीच्या उत्स्फूर्त जल्लोषात मोदींनी भरला उमेदवारी अर्ज
सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!
पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा
पेट्रोलपंप उभारण्याची परवानगी दिली. उद्धव ठाकरे सरकारने हा पेट्रोल पंप बेनामी कंपनीला चालवण्यासाठी दिला. या पेट्रोल पंपच्या आसपासची झाडे मारण्यात आली आणि तोडण्यात आली. अनेक वेळा तक्रारी करून दुर्लक्ष झाले आहे. या होर्डिंगसाठी १६ लाख ९७ हजार ४४० रुपये भाडे मिळत होते, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.