बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!

कलम- ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पार पडली निवडणूक

बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये यावेळी विक्रमी मतदान झाले आहे. बारामुल्ला हे दहशतवादासाठी ओळखले जाते.परंतु, हे चित्र आता बदलत आहे.लोकसभेच्या पाचव्या टप्प्याची मतदानाची आकडेवारीच हे सर्व सांगून जाते.गेल्या अनेक वर्षांपासून येथील तणावामुळे लोक मतदानात सहभागी झाले नव्हते. मात्र यावेळी येथे विक्रमी मतदान झाले आहे.पंतप्रधान मोदींनी देखील बारामुल्लाच्या जनतेचे कौतुक केले आहे.

जम्मू काश्मीर मधील कलम- ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडली. यावेळी बारामुल्ला येथे पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाले असून सोमवारी एकूण ५८.९० टक्के मतदान झाले आहे.यापूर्वी १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारी पेक्षा यावेळेची आकडेवारी सर्वाधिक आहे.तसेच सोपोर विधानसभा मतदारसंघात ४४.३६ टक्के मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!

इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’

प्रज्वल रेवण्णाला आवाहन ‘घरी परत ये आणि चौकशीला सामोरे जा’

लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू

बारामुल्लामध्ये झालेल्या विक्रमी मतदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक करत आभार मानले आहेत.पंतप्रधान मोदींनी हा एक चांगला ट्रेंड असल्याचे म्हटले आहे.पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले की, बारामुल्लाच्या माझ्या बंधू-भगिनींचे अभिनंदन, ज्यांनी लोकशाही मूल्यांवर आपला अतूट विश्वास ठेवला आहे. या प्रकारचा सक्रिय सहभाग हा एक उत्तम ट्रेंड आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देखील बारामुल्लाच्या जनतेचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही जम्मू-काश्मीरच्या मतदारांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version