महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरा याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांमध्ये संताप आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्टँड-अप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे, हे कामराला माहिती पाहिजे.
बाळासाहेब ठाकरेंचा कोणाकडे वारसा गेला, हे जनतेने ठरवेलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, हे चुकीचे आहे. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
हे ही वाचा :
देवाने पुरुषांनाचं प्रथम निर्माण केले असावे, चुका पहिल्यांदाच होतात… डिंपल यादव असं का म्हणाल्या?
कोणीही कायदा, संविधान आणि नियमांपलीकडे जाऊ नये
साडेचार लाख मोहरेइस्लाम गार्सियांची हिंदू धर्मात लवकरच घरवापसी
नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
ते पुढे म्हणाले, कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, ते जे संविधानाचे पुस्तक दाखवत आहेत. त्यांनी जर संविधान वाचले असेल किंवा संविधानाची माहिती असेल तर संविधानानेच सांगितले आहे कि स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.