इत्तेहादे मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. २१ जुलै रोजी पाच जोडप्यांचे इस्लाम धर्मात परिवर्तन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे काम करण्यासाठी मौलाना यांनी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मागितली असल्याचे म्हटले आहे. मौलाना तौकीर रझा यांच्या या घोषणेमुळे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंह संतापले आहेत. हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
वास्तविक, मौलाना तौकीर रझा हे एक वादग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातात. बरेली दंगलीचाही त्यांच्यावर आरोप आहे. मौलानाने अलीकडेच जाहीर केले की ते एकाच वेळी पाच हिंदू मुला-मुलींचे धर्मांतर करणार आहेत. या सर्वांचे लग्न इस्लामिक रितीरिवाजांनुसार पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तौकीर रझा यांनी सांगितले की, २१ जुलै रोजी धर्मांतर आणि निकाह असा कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
केजारीवालांची प्रकृती व्यवस्थित
भाजपकडून नमो एक्स्प्रेस ट्रेन पंढरपूरला रवाना
मनोरमा खेडकरांचा पोलिसांशी हुज्जत घालतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर!
खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !
मौलाना तौकीर रझा यांच्या धर्मांतराच्या घोषणेबाबत भाजप नेते गिरिराज सिंह यांना विचारले असता ते संतापले. गिरीराज सिंह म्हणाले, “हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. आमच्या पूर्वजांच्या हातून चूक झाली होती. जर स्वातंत्र्याच्या वेळी देशातील सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवले असते, तर आज देशात अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती.
दरम्यान, मौलानाने धर्मांतराची घोषणा केल्यापासून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यांना बरेलीचे वातावरण बिघडवायचे आहे, असे धार्मिक नेते पंडित सुशील कुमार पाठक यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, मुला-मुलींनी स्वतःच्या इच्छेने लग्न करून धर्मांतर केल्यास आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, धर्मांतराची घोषणा करणे हे योग्य नाही. मौलाना यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी माझी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.