आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात खेळवली जाणार असून ५ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. त्यापूर्वी २९ सप्टेंबरपासून वर्ल्डकपचे सराव सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघाला दोन दोन सराव सामने खेळायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघ एक आठवडा आधीच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या सर्व वेळापत्रकात पाकिस्तानच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तान संघातील खेळाडूंना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघाच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतात येणाऱ्या इतर सर्व संघांचे व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला दुबईला जाऊन खेळाडूंसोबत शिबिर घेण्याची योजना रद्द करावी लागली आहे.
आठवड्याभरापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप त्यांना व्हिसा मिळालेला नाही. निर्धारित वेळेत व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाला २९ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे न्यूझीलंडविरोधात सराव सामना खेळायचा आहे.
ईएसपीएननुसार, पाकिस्तान संघाचे सर्व खेळाडू विश्वचषक स्पर्धेपूर्वी शिबिरासाठी दुबईला जाणार. तेथून संघ भारतातील हैदराबादला रवाना होणार. मात्र, या वेळापत्रकात आता बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यात आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही. व्हिसाच्या मंजुरीअभावी पाकिस्तानी क्रिकेट संघ लाहोरमध्ये मुक्काम करून २७ सप्टेंबरला दुबईला जाणार आहे. तेथून ते २९ सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी हैदराबादला येतील.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियावर मात करत भारत ठरला क्रमांक एकचा एकदिवसीय क्रिकेट संघ
स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी
अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण १० संघ सहभागी होत असून नऊ विदेशी संघांपैकी केवळ पाकिस्तानला अद्याप व्हिसा मिळालेला नाही.