24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषमुक्त विद्यापीठाने वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे!

मुक्त विद्यापीठाने वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे!

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Google News Follow

Related

‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे नवीन अभ्यास केंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

हेही वाचा..

डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!

चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार

जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना अटक

राहुल गांधींवर ममता बॅनर्जी नाराज?

मंत्री पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यास केंद्र तयार करता येतील का याबाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे जी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल. तसेच उच्च शिक्षणामध्ये व्यवसायिक उपयोजित व कौशल्याधिष्टीत शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा