पंतप्रधान मोदींची आज (२५ मे) बिहारमध्ये सभा पार पडली.पंतप्रधान मोदींनी आज पाटणा, करकट आणि नंतर बक्सर येथे निवडणूक रॅलींना संबोधित केले.पाटण्यातील बक्सर येथे भाजपचे उमेदवार रामकृपाल यादव यांच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.पंतप्रधान मोदी टीका करत म्हणाले, इंडी आघाडीच्या नेत्यांचे एकच काम आहे ते म्हणजे, ‘अपना काम बनता, भाड में जाये….’
पंतपधान मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले की, आजचा जमाना हा ‘एलईडी बल्बचा’चा आहे. मात्र, या ठिकाणी बिहारमध्ये हे लोक कंदील घेऊन फिरत आहेत.तुम्हाला सांगतो या ठिकाणी एक असा कंदील आहे, ज्याने केवळ एकाच घरात उजेड दिला.३० वर्षांपूर्वीचा इतिहास तुम्ही बघा पाहिजे तर केवळ एकच घरात या कंदिलाने उजेड दिला आहे.
हे ही वाचा:
डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनी मालकाची सुटका!
‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’
पुणे पोलिसांकडून सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारी!
अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!
या कंदिलाचे एकच आहे, चारही ठिकाणी अंधार झाला तर चालेल मात्र एका घरात उजेड आला पाहिजे.या कंदीलवाल्यांनी अख्या बिहारला अंधारात ठेवले आहे. ते पुढे म्हणाले इंडी आघाडी वाल्यांचे एकच सूत्र आहे ते म्हणजे, ‘अपना काम बनता, भाड में जाये….’ आणि सभेतून एकच आवाज आला ‘जनता’.पंतप्रधान मोदी म्हणाले, जोराने उत्तर द्या जेणेकरून त्यांच्यापर्यंत आवाज जाईल.