नारायण राणेंचं पद गेलं म्हणता म्हणता, वैभव नाईकांचंच पद गेलं!

सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख पदावरून ठाकरे गटाने हटवले

नारायण राणेंचं पद गेलं म्हणता म्हणता, वैभव नाईकांचंच पद गेलं!

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार असे भाकित सिंधुदूर्गातील ठाकरे गटाचे आमदार गणेश नाईक यांनी केला. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार असे वैभव नाईक यांनी म्हटले होते. नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या वैभव नाईकांचेच पद गेल्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. वैभव नाईक यांना सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख पदावरून ठाकरे गटाने हटवले आहे. जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर आपण जिल्ह्याबाहेरही काम करत असल्याने ठाकरेंनी पदावरून मुक्त केले असेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

नारायण राणेंचे राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. याआधी राणे लोकांचेसोत राजकीय अस्तित्व ठरवत होते. पक्षाचं ठरवत होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे भाकीत कुडाळ मालवण ठाकरे गटाचे सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकारांसमोर केले.

हेही वाचा :

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?

त्या वादग्रस्त विधानानंतर बच्चू कडूंचा माफीनामा

वैभव नाईक म्हणतात की, शिंदे गटात आणि भाजप गटात मला येण्यासाठी विचारणा होत आहे. माझ्यावर दबाव टाकला जातोय, ही वस्तूस्थिती आहे. एवढ्या दबावाला झुगारून मी कुठल्या पक्षात गेलो नाही आणि कुठल्या पक्षात जाणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली गेली १५ वर्षे जिल्हाप्रमुख आहे, त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. १५ वर्षे काम गेल्यानंतर मी आता जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा हळुहळु काम करायला लागलोय. हेच काम करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही जबाबदारी काढून घेतली असेल. आज उद्धव ठाकरे माझ्या जिल्ह्यात शिवसेना वाढण्यासाठी जे काम देतील ते काम मी करणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली.

याआधीही वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले होते. आठ तालुक्यांसाठी जिल्ह्याप्रमुख असलेले वैभव नाईक यांच्याकडे फक्त कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांचे जिल्ह्याप्रमुख पद ठेवण्यात आले होते. तर उर्वरित सहा तालुके संजय पाडते यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली होती. याची घोषणा शिवसेना भवनातून केली होती.

Exit mobile version