देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या झाली अर्धी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या झाली अर्धी

केंद्र सरकारने ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षा दलांकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कठोर कारवाई सुरू असून याला यशही मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. याचं संदर्भात अमित शाह यांनी मंगळवार, १ एप्रिल रोजी मोठी घोषणा केली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा करताना मंगळवारी सांगितले की, देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या आता सहावर आली आहे. पूर्वी या जिल्ह्यांचा आकडा १२ होता, परंतु गेल्या काही महिन्यांत सरकारने नक्षलवादाच्या विरोधात ज्या पद्धतीने मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ही संख्या कमी होऊन मोठा दिलासा मिळाला आहे.

अमित शाह यांनी एक्सवर लिहिले आहे की, “नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, आज आपल्या देशाने डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून ६ पर्यंत कमी करून एक नवीन टप्पा गाठला आहे. मोदी सरकार नक्षलवादाबद्दल कठोर दृष्टिकोन आणि सर्वव्यापी विकासासाठी अथक प्रयत्नांसह सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण करत आहे. भारत ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद कायमचा समूळ नष्ट करण्याचा निर्धार करत आहे.”

हे ही वाचा : 

दोन मालगाड्या आदळल्या; दोन्ही गाड्यांचे लोको पायलट गतप्राण!

जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात रात्रीपासून काय घडतंय ?

“भारताची सात राज्ये जमिनीने वेढलेली, बांगलादेशचं महासागराचा रक्षक”; युनुस यांचे चीनला आर्थिक विस्तारासाठी आवाहन

नव्या आर्थिक वर्षात व्यावसायिकांना कोणता दिलासा मिळाला

त्यामुळे देशात आता केवळ सहा जिल्हे नक्षलग्रस्त राहिले आहेत. हे सहा जिल्हेही ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे नक्षलमुक्त होतील, असा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाने (LWE) प्रभावित जिल्हे असे आहेत जिथे नक्षलवादी कारवाया आणि हिंसाचार अजूनही सुरू आहेत. या जिल्ह्यांना ‘सर्वाधिक प्रभावित जिल्हे’ म्हणून उप-वर्गीकृत करण्यात आले आहे. गेल्या आढाव्यानुसार, १२ सर्वात जास्त नक्षल प्रभावित जिल्हे होते. अधिकृत नोंदीनुसार, २०१५ मध्ये असे ३५ जिल्हे, २०१८ मध्ये ३० जिल्हे आणि २०२१ मध्ये २५ जिल्हे होते. आता हा आकडा वेगाने कमी होत आहे. गेल्या १० वर्षांत २९ जिल्ह्यांमधून नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे आणि आता नक्षलवाद हा फक्त सहा जिल्ह्यांमध्ये उरले आहे हे स्पष्ट झाले आहे.

मुरलेल्या फडणवीसांना पक्के ठाऊक आहे, चर्चेतील नाव यादीत नसते... | Dinesh Kanji | Narendra Modi |

Exit mobile version