31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषमुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

मुंबईकरांना दिलासा; कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

Google News Follow

Related

देशात राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढताना दिसत असला तरी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत असतानाच मुंबईमध्ये मात्र, रुग्ण संख्येमध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत रविवार, १६ जानेवारी रोजी सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

रविवारी मुंबईत ७ हजार ८९५ नवे कोरोना बाधित आढळले होते. ही रुग्ण संख्या आधीच्या तीन दिवसांच्या रुग्ण संख्येपेक्षा कमी आहे. बुधवारी मुंबईत १६ हजार ४२०, गुरुवारी १३ हजार ७०२, शुक्रवारी ११ हजार ३१७, शनिवारी १० हजार ६६१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड- १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

सोन्याची लंका कुणी लुटली?

पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे निधन

संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!

छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला?

मुंबईत सध्या रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित तिसरी लाट येऊन गेल्याचा अंदाज डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केला. मुंबईत मागील २४ तासांत ७ हजार ८९५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच या रुग्ण संख्येच्या तीनपटीने अधिक म्हणजेच २१ हजार २५ रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्याचे टास्क फोर्सने म्हटले असले तरी ही घोषणा करण्यापूर्वी आणखी किमान एक आठवडा परिस्थितीचा अंदाज घ्यायला हवा, असे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटले आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट पाहायला मिळत असली तरी राज्यात दररोज ४० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात ४१ हजार ३२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा