शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

नोबेल शांतता पुरस्कारासाठी एकूण २८६ उमेदवारांचे अर्ज आले होते

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

नोबेल समितीकडून सध्या नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. जगभरात सर्वोच्च मानला जाणारा नोबेल पुरस्कार यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच २०२४ चा नोबेल शांतता पुरस्कार एका जपानच्या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. निहोन हिडांक्यो असे या जपानच्या संस्थेचे नाव आहे.

शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. निहोन हिडांक्यो ही हिरोशिमा आणि नागासाकीतील अणुबॉम्बमधून वाचलेल्यांची तळागाळातील चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीला हिबाकुशा म्हणूनही ओळखले जाते. अण्वस्त्रमुक्त जगासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि अण्वस्त्रांचा पुन्हा कधीही वापर होऊ नये हे साक्षीदाराच्या साक्षीतून दाखवून दिल्याबद्दल त्यांना शांतता नोबेल पुरस्कार दिला जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.माहितीनुसार, नॉर्वेजियन नोबेल समितीला यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी एकूण २८६ उमेदवारांचे अर्ज आले होते.

या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

अल जझीराचा तथाकथित पत्रकार देत होता भारतविरोधी घोषणा!

नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये स्फोट होऊन दोन अग्निवीरांचा मृत्यू

मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!

डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात १९०१ मध्ये झाली असून २०२४ पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील २२९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल १० डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे.

Exit mobile version