कॉंग्रेसचा जाहीरनाम्यात माओवाद्यांची विचारधारा प्रतिबिंबित करतो, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असायला हवा, असा दावा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केला होता. जर कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास ते देशाच्या संपत्तीचे मुस्लीम, घुसखोरांमध्ये पुनर्वितरण करतील, असेही ते यावेळी म्हणाले. राजस्थानमधील बांसवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावर आता तथाकथित मिडीयाने गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.
हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि इस्लामवाद्यांच्या गुन्हे स्वच्छ करण्याचा इतिहास असलेल्या मीडियाने, पंतप्रधान मोदींचे भाषण “इस्लामोफोबिक” असल्याचा दावा केला आहे. कारण त्यात सर्व मुस्लिमांना घुसखोर आणि ‘ज्यांना अधिक मुले आहेत’ असे म्हटले आहे.
हेही वाचा..
बॉम्बे वायएमसीएच्या माध्यमातून क्रीडा शिबिरांचे आयोजन
देशाच्या कर उत्पन्नात १७.७ टक्क्यांनी वाढ
बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी
बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!
चुकीची माहिती पसरवणाऱ्या इस्लामवाद्यांच्या यादीमध्ये AltNews चा स्वयंघोषित ‘फॅक्ट-चेकर’ मोहम्मद जुबेरचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकल्यावर सर्व मुस्लिमांना घुसखोर म्हटले जात असल्याचा दावा इस्लामवादी आणि तथाकथित तथ्य-तपासक करत असताना, काँग्रेस या दोन्ही विभागांमध्ये संपत्तीचे पुनर्वितरण करेल, असे सांगताना त्यांनी मुस्लिम आणि घुसखोर यांच्यात फरक केल्याचे स्पष्ट होते.
पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, जर त्यांनी सरकार बनवले तर प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल. आमच्या बहिणींकडे किती सोने आहे, सरकारी कर्मचाऱ्यांकडे किती पैसे आहेत हे तपासले जाईल. आमच्या बहिणींच्या मालकीचे सोने समान वाटले जाईल असेही त्यांनी सांगितले. तुमची मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला आहे का? ‘मंगळसूत्र’ सोने की कीमत का मुद्दा नहीं है, उनके सपनो से जुडा हुआ है…”
यावरच प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की याचा अर्थ संपत्ती सर्वेक्षण केल्यानंतर ते ज्या लोकांना जास्त मुले आहेत त्यांना, बेकायदेशीर स्थलांतरितांना आणि मुस्लिमांना वितरित करतील, ज्यांच्यासाठी मनमोहन सिंग यांनी संसाधनांवर पहिला अधिकार असल्याचे सांगितले होते.