भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा

गंभीर आणि डब्लूव्ही रमण यांच्या मुलाखती

भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा

भारताचा संघ टी २० विश्वचषक स्पर्धेतील सुपर आठ फेरीच्या तयारीमध्ये व्यग्र असला तरी आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ते भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक कोण होईल, याकडे. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर या शर्यतीत आघाडीवर आहे.

मंगळवारी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी त्यांची मुलाखत घेतली. तसेच, डब्ल्यूवी रमन यांनीही मुलाखत दिली. या दोघांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलाखत दिली. त्यात अशोक मल्होत्रा यांचाही समावेश होता.

‘गंभीर हे सीएसीच्या मुलाखतीमध्ये उपस्थित होते. आज एका टप्प्यातील चर्चा झाली. उद्या आणखी एका टप्प्यातील मुलाखत होण्याची आशा आहे. गंभीरसह रमण यांचीही मुलाखत झाली. त्यांचीही मुलाखत ऑनलाइन झाली. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाबाबत स्वतःचा दृष्टिकोन आणि पुढील वाटचाल यावर सादरीकरण केले. ही मुलाखत ४० मिनिटे चालली. सादरीकरणापूर्वी काही प्राथमिक प्रश्नही विचारण्यात आले,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. गंभीर हेच प्रमुख दावेदार असून त्यांच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे, असे मानले जात आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

हे ही वाचा..

‘मोदीजी धमक्यांना घाबरणार नाहीत’

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता खात्यात जमा!

आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकले…

सीएसीचे अध्यक्ष मल्होत्रा आणि त्यांचे सहकारी जतिन परांजपे आणि सुलक्षण नाईक यांच्यासोबत गंभीर यांच्यात काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र ही चर्चा पुढील तीन वर्षांतील गंभीरच्या रणनितीवर केंद्रित होती, असे सांगितले जात आहे. या तीन वर्षांत तीन आयसीसी स्पर्धा होत आहेत. मंगळवारी संघटनेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक असून चिटणीस जय शहा अंतिम घोषणेआधी निवडप्रक्रियेबाबत सदस्यांना माहिती देतील.

Exit mobile version