हरयाणातून गिधाडे आणून ती ताडोबा, पेंचमध्ये सोडणार

महाराष्ट्रात गिधाडे नामशेष होत असल्यामुळे उचलले पाऊल

हरयाणातून गिधाडे आणून ती ताडोबा, पेंचमध्ये सोडणार

नैसर्गिक अधिवासात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेतला जात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तांत्रिक समिती आणि हरयाणा सरकारने गिधाडांच्या २० जोड्या महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हरयाणाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे राज्य सरकारने गिधाडांची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत हरियाणामधील पिंजोरमधून गिधाडांच्या २० जोड्या म्हणजेच ४० पक्षी महाराष्ट्रात हलविण्यास परवानगी देण्यात आली आहे. ताडोबा आणि पेंचमध्ये प्रत्येकी सहा तर मेळघाटमध्ये दहा गिधाडे सोडण्यात येणार आहेत. जिओ टॅग द्वारे या गिधाडांवर लक्ष असणार आहे.

पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे देण्यात येणार आहेत. या पक्ष्यांना सोडण्यासाठी सर्व तांत्रिक साहाय्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून (बीएनएचएस) घेतले जाणार आहे. तसेच पुणे आणि नाशिक येथे गिधाड प्रजनन आणि संवर्धन केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा:

खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या, सात मुलींना वाचवण्यात यश

“उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”

कर्नाटकमधील काँग्रेस विजयाच्या व्यूहरचनेचा हा शिल्पकार

कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या

राज्यात नोंद झालेल्या सहाशेच्या जवळपास असलेल्या पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटात असल्याची माहिती आहे. यात गिधाडांचाही समावेश आहे..

निसर्गात स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गिधाडेही हे केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर अवलंबून असतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात नऊ प्रजाती सापडतात. गरुडापेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा, ताकदवान असतो. तरी, गिधाड शिकार करत नाही.

Exit mobile version