गोरंट्याल फसले; तो सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला!

कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता १९९८ मध्येच मेल्याचे म्हटले अन् घोळ झाला

गोरंट्याल फसले; तो सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला!

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीय सलीम कुत्ताबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याबाबत गंभीर आरोप केले होते. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाशिक शिवसेना ठाकरे गटाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा दावा केला आणि नितेश राणे यांनी सभागृहात त्यांचे फोटो सादर केले.त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी सलीम कुत्ता याची १९९८ मध्ये हत्या झाल्याचा दावा केला आणि चर्चेला उधाण आलं. कैलास गोरंट्याला यांच्या दाव्यामुळे सुधाकर बडगुजरसोबत असणारा सलीम कुत्ता कोण? हा प्रश्न निर्माण झाला.मात्र,आता या प्रश्नाचा उलगडा झाला आहे.कैलास गोरंट्याल यांनी दावा केलेल्या आरोपीचे नाव सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला असल्याची माहिती समोर आली आहे.

सलीम कुर्ला याची १९९८ साली विरोधी गँगकडून हत्या झाल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले होते. परंतु आमदार गोरंट्याल यांचा सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन नावात गोंधळ झाला. कैलास गोरंट्याल यांनी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती दिली.सलीम कुत्ता सध्या येरवडा कारागृहातच आहे. तर १९९८ साली मारल्या गेलेल्या सलीम कुर्लावर १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप होता.सलीम कुर्लाचा खटला सुरु असतानाच मृत्यू झाला.मात्र, सुधाकर बडगुजर यांच्यासोबत व्हिडिओत दिसणारा आरोपी सलीम कुत्ताच आहे.

हे ही वाचा:

 गोंधळ घातल्याप्रकरणी तब्बल ३३ विरोधी खासदारांचे निलंबन

मंत्रिपद आहे तोपर्यंत चालक विरहित गाडी नाही!

 ज्ञानवापी मशीद संकुलातील वैज्ञानिक सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर   

एनआयएची राज्यात छापेमारी, एक तरुण ताब्यात!

दरम्यान, नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.त्यानंतर ठाकरे गटाकडून देखील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यात आले.मंत्री गिरीश महाजन देखील सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा दावा करत फोटो व्हायरल केले.मात्र, गिरीश महाजनांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे देखील पुढे सरसावले.सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे.

त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी होईल आणि संजय राऊत लवकरच डिसेंबरच्या अंती किंवा जानेवारी महिन्यामध्ये तुरुंगात दिसतील, असे त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. सलीम कुत्ताचे प्रकरण ज्या पद्धतीने समोर आले आहे, सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय यामुळे या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळणार आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

Exit mobile version