पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची हत्या सुरक्षेअभावी झाल्याचे पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात कबूल केले आहे.पंजाब सरकारचे वकील ॲडव्होकेट जनरल गुरमिंदर सिंग गॅरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने कबुली दिल्यानंतर सिद्धू मूसवालाचे वडील बलकौर सिंग यांनो संताप व्यक्त केला आहे.
लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी सांगितले की, पंजाब सरकारचे वकील ॲडव्होकेट जनरल गुरमिंदर सिंग गॅरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सिद्धू मूसवालाची सुरक्षा कमी केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, सुरक्षे अभावी सिद्धूची हत्या झाल्याचे आता सरकारनेही मान्य केले असून ज्यांच्यामुळे सुरक्षा कमी करण्यात आली त्या लोकांवर सरकारने एफआयआर दाखल करून कारवाई करायला हवी.
हे ही वाचा:
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
कॅनडा पोलिसांकडून तीन भारतीयांना अटक
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!
या हत्येतील आरोपींच्या भूमिकेपेक्षा पंजाब सरकारची भूमिका अधिक आहे. लॉरेन्स बिश्नोई याने दीड वर्षांपूर्वी तुरुंगातून मुलाखत दिली होती, मात्र सरकारला अद्याप काहीही कळू शकलेले नाही, ते पुढे म्हणाले.शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी सरकारवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे म्हटले आहे. सुरक्षा कवच काढून घेतल्यानंतर दोनच दिवसांत गायकाची हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले.
वास्तविक, पंजाब सरकारने सिद्धू मूसवाला यांच्या सुरक्षेसाठी ४ सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते, त्यातील दोन कर्मचारी नंतर कमी करण्यात आले.याचा फायदा घेत गोल्डी ब्रारने सिद्धू मूसवालाची हत्या करण्यासाठी शूटर्स पाठवले. पोलिसांनीही आरोपपत्रात हे मान्य केले आहे. पोलिसांनी २६ मे रोजी सुरक्षा कमी केली आणि त्यानंतर २९ मे २०२२ रोजी सिद्धू मूसवाला यांची हत्या झाली.