बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोकृष्ट चित्रपट

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा संपन्न

बहुचर्चित ‘द काश्मीर फाइल्स’ ठरला सर्वोकृष्ट चित्रपट

काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात ,वादात सापडलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या श्रेणीत सर्वोत्कृष्ट चित्रपट २०२३ हा पुरस्कार मिळाला आहे.

प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली होती. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. आलीय भटला गंगुबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी रणबीर कपूरला पुरस्कार देण्यात आला. तर रिषभ शेट्टीला गेल्या वर्षी आलेल्या कंतारा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट आश्वासक अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी काय म्हणाले?

सर्वोकृष्ट चित्रपट म्हणून दादासाहेब फाळके पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराचा आनंद दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे. त्यांनी मी हा पुरस्कार दहशतवादाचे बळी ठरलेल्या आणि भारतातील सर्व जनतेला समर्पित करतो. कृपया माहिती द्या की, या चित्रपटासाठी अनुपम खेर यांची सर्वात अष्टपैलू अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर

तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले!

गिरीश बापटांबद्दल राष्ट्रवादीला चिंता का?

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ

याच पुरस्कारांमध्ये वरून धवनला त्याच्या भेडिया चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉइस सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ . ‘उंचाई ‘ आणि कंतारा यासारख्या चित्रपटांत केलेल्या अभिनयाने अनुपम खेर यांना मोस्ट व्हर्सेटाइल ऍक्टर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तर अभिनेत्री विद्या बालन हिला तिच्या जलसा या चित्रपटासाठी क्रिटिक्स सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून चूप या चित्रपटासाठी आर. बाल्की यांना देण्यात आला आहे.

चित्रपटांबरोबरच टीव्ही श्रेणीत देखील पुरस्कार देण्यात आले असून ‘अनुपमा’ या मालिकेला दूरचित्रमालिकेतील संपूर्ण वर्षातील उत्कृष्ट मालिका या साठीचा पुरस्कार मिळाला आहे. तर दूरचित्रवाणीचा सर्वोत्तम अभिनेता म्हणूंन झैन इमामला फना या मालिकेसाठी देण्यात आला आहे.तर सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तेजस्वी प्रकाशला नागीण या मालिकेसाठी देण्यात आला. तर अभिनेत्री रेखा यांना चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला.

Exit mobile version