शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आली!

साताऱ्यातील सरकारी संग्रहालयात वाघनखे ठेवण्यात येणार

शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आली!

बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनहून महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. छत्रपती शिवरायांची वाघनखे आज (१७ जुलै) सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाली. ही वाघनखे आता साताऱ्याला नेण्यात येणार आहेत. राज्यसरकाच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.

लंडनहून आलेली शिवरायांची वाघनखे आता साताऱ्याला नेण्यात येणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. वाघनखा संबंधित १९ तारखेला साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ही वाघनखे केवळ एक वर्षासाठी राज्यात ठेवण्यात येणार होती. मात्र, राज्य सरकारने प्रयत्न करून एक वर्षीय करारात दोन वर्ष अधिक वाढवून तो आता तीन वर्षीय करण्यात आला आहे. राज्यातल्या शिवभक्तांसाठी आता ही वाघनखे पाहता येणार आहेत.

हे ही वाचा:

‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’

महिला आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार; भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात

खेडकरांच्या बंगल्याबाहेरील अनधिकृत बांधकाम अखेर हटवलं !

विशाळ गडावरील ९० हुन अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त !

वाघनखे राज्यात आणण्यासाठी १४ लाख रुपये इतका खर्च झाल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शस्त्रांचे प्रदर्शन चार ठिकाणी उभे करण्यात येणार असून त्या त्या संग्रहालयांचे नूतनीकरण आणि डागडुजी याकरता ७ कोटी (अक्षरी सात कोटी) इतकाच खर्च झाल्याची माहिती, मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

दरम्यान, लंडनहून आलेली ही वाघनखे शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कारणासाठी वापरली होती का?, असा सवाल अजूनही उपस्थित होत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले आहेत.

Exit mobile version