27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
घरविशेष‘कल्की २८९८ एडी’ चारशे पार!

‘कल्की २८९८ एडी’ चारशे पार!

भारतात ४०० कोटी रुपयांची तर जगभरात ७०० कोटी रुपयांची कमाई

Google News Follow

Related

साउथ सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास, बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई करत अनेक नवे विक्रम आपल्या नावे केले आहेत. ‘कल्की २८९८ एडी’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला असून या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जोरदार कमाई केली आहे.

‘कल्की २८९८ एडी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. या चित्रपटाने भारतात ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमावाला असून जगभरात ७०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने जागतिक आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अनेक नवीन विक्रम रचले आहेत.

पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये सिनेमाने ४१४. ७५ कोटींची कमाई केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमाई तेलुगु भाषेमध्ये झाली आहे. तेलुगु भाषेत २१२ कोटींची कमाई झाली आहे. तर, हिंदी भाषेत १६२ कोटी, तामिळ भाषेत २३ कोटी, मल्याळम १४ कोटी तर कन्नड भाषेत २.८ कोटींची कमाई केलेली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला आहे. सुमारे ६०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट जगभरात सुमारे ८५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. शिवाय हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटामध्ये AI तंत्रज्ञान, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनमध्ये सत्तांतर; १४ वर्षांनंतर लेबर पक्ष सत्तेत

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत; नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सूचना

अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

भारतात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा गाठला की भारतात ५०० कोटी रुपयांची कमाई करणारा हा आठवा भारतीय चित्रपट असणार आहे. जागतिक बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा गाठण्याचे उदिष्ट या सिनेमासमोर असणार आहे. शिवाय असे झाल्यास जगभरात १००० कोटींचा टप्पा पार करणारा भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा केवळ सातवा चित्रपट ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा