29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषक्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या

क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडू, एका चेंडूत १८ धावा दिल्या

टीएनपीएलमधील दुसऱ्या सामन्यातील आगळा वेगळा विक्रम  

Google News Follow

Related

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२३ संपल्यानंतर आता तामिळनाडु प्रीमियर लीगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तामिळनाडू राज्याकडून तामिळनाडु प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगच्या दुसऱ्याच सामन्यात एक आगळा वेगळा विक्रम नोंद झाला आहे. भारतीय टी- २० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा चेंडू या सामान्यावेळी टाकण्यात आला.

सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात दुसरा सामना पार पडला. यावेळी स्पार्टन्सचा गोलंदाज अभिषेक तंवर याने सामन्यामधील अखेरच्या षटकामधील अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. क्रिकेटच्या इतिहासात एका चेंडूवर इतक्या धावा देण्याची आश्चर्यकारक बाब घडली.

टी- २० क्रिकेटमध्ये एका षटकात ३६ धावा करण्याचा विक्रम झालेला आहे. मात्र, एका चेंडूत १८ धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टीएनपीएल मधील हा विक्रम अनेक वर्ष लक्षात ठेवला जाणार आहे.

अभिषेक याने २०व्या ओव्हरची सुरुवात चांगली केली होती. मात्र, अखेरच्या चेंडूनंतर खेळ पालटून गेला. सुरुवातीच्या ५ चेंडूवर त्याने ८ धावा दिल्या होत्या. सहाव्या चेंडूवर त्याने संजय यादवला यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केले. हा आनंद साजरा करत असतानाच हा चेंडू नो बॉल देण्यात आला.

पुढे नो बॉलनंतर अभिषेकने फ्री हिटसाठी चेंडू टाकला पण तो देखील नो बॉल झाला आणि यावेळी संजयने फ्री हिटवर षटकार मारला. त्यानंतर अभिषेकने टाकलेला पुढचा चेंडू देखील नो बॉल ठरला ज्यावर संजयने दोन धावा काढल्या. आता आणखी एक फ्री हिटचा चेंडू होता जो अभिषेकने वाईड टाकला. अखेर अभिषेकने सहावा चेंडू योग्य टाकला पण त्यावर संजयने षटकार मारला. अशा पद्धतीने संजयने एका चेंडूवर १८ धावा केल्या.

हे ही वाचा:

वडिलांनी ३० वर्षे काम केलेल्या वसतिगृहातचं मुलाने तरुणीची केली हत्या

रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार

ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले

असा टाकला सहावा चेंडू

  • पहिला प्रयत्न- बोल्ड, नो बॉल
  • दुसरा प्रयत्न- षटकार, नो बॉल
  • तिसरा प्रयत्न- २ धावा, नो बॉल
  • चौथा प्रयत्न- वाईड
  • पाचवा प्रयत्न- षटकार
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा