मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आत्मविश्वास

मोदी युग भारताला वैभवाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात यशस्वी पंतप्रधान तसेच आमच्या काळातील सर्वात महान जागतिक नेते आहेत. ते जागतिक हिताच्या मंत्रावर काम करत असून भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवत आहेत. अवघ्या दोन दशकात गुजरात ते ग्लोबल स्तेज्पार्य्नात त्यांच्या या प्रवासाची कथा हि आधुनिक महाकाव्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला खात्री आहे कि मोदी युग भारताला समृद्धी, प्रगती आणि वैभवाच्या नवीन शिखरांवर घेऊन जाईल, असा आत्मविश्वास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. व्हायब्रंट गुजरात समिट २०२४ मध्ये बोलत ते होते.

हेही वाचा..

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याआधीच मणिपूर सरकारचा मैदान देण्यास नकार!

राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मिळणार

मोदींचे कौतुक केले म्हणून चिदंबरम पुत्राला काँग्रेसकडून नोटीस

उद्योगपती अंबानी म्हणाले, २०४७ पर्यंत भारताला ३५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यामध्ये एकटे गुजरात हे ३ ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल. संपूर्ण भारतात जागतिक दर्जाची मालमत्ता आणि क्षमता निर्माण करण्यासाठी समूहाच्या १२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी एक तृतीयांश गुंतवणूक गुजरातमध्ये आहे. पुढील १० वर्षात महत्त्वपूर्ण गुंतवणूकीसह गुजरातच्या विकास कथेत आघाडीची भूमिका बजावत राहील. हरित ऊर्जेच्या नेतृत्वाखाली गुजरातला जागतिक आघाडीवर बनवण्यात रिलायन्स योगदान देईल.

अंबानी म्हणाले, आम्ही २०३० पर्यंत अक्षय उर्जेद्वारे गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्याचे लक्ष्य पूर्ण करू. यासाठी आम्ही जामनगरमध्ये ५ हजार एकरांवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स बांधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हरित नोकऱ्या निर्माण होतील आणि हरित उत्पादने आणि सामग्रीचे उत्पादन सक्षम होईल आणि गुजरातला हरित उत्पादनांचा आघाडीचा निर्यातदार बनवेल. गुजरात पूर्णपणे ५ जी सक्षम आहे. त्यामुळे गुजरात डिजिटल डेटा प्लॅटफॉर्म आणि एआय अवलंबनात जागतिक आघाडीवर असेल, असेही ते म्हणाले.

Exit mobile version