सुट्टीसाठी म्हणून घरी आलेला भारतीय लष्करातील जवान किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेला असताना जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून बेपत्ता झाला होता. अखेर त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या भारतीय जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे.
लडाखमध्ये तैनात असलेला जावेद अहमद वानी सुट्टीसाठी घरी आला होता. मात्र, शनिवारी तो त्याच्या मूळ कुलगाम जिल्ह्यातून बेपत्ता झाला होता. या बेपत्ता जवानाचा शोध कुलगाम पोलिसांनी घेतला असून लवकरच वैद्यकीय तपासणीनंतर त्याची संयुक्त चौकशी सुरू होईल. त्यानंतरच संपूर्ण तपशील समोर येईल, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी ट्विटद्वारे दिली.
पोलिसांनी यापूर्वी वानीच्या बेपत्ता प्रकरणाबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असावे, अशी भीती व्यक्त केली जात होती. तथापि, त्याच्या कथित अपहरणाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कोणताही अतिरेकी किंवा दहशतवादी गट पुढे आला नव्हता. जावेद अहमद वाणी ड्युटीसाठी लडाख तळावर परतणार होता, त्याच्या एक दिवस आधीच तो बेपत्ता झाला होता. तो त्याच्या गावाजवळच्या शहरात किराणा खरेदीसाठी गेला होता, पण घरी परत आला नाही.
हे ही वाचा:
लवासाचा सौदा हा दृश्यम् पार्ट थ्री??
कापसाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडसे- महाजन यांच्यात जुंपली
गृहपाठ न केल्याने त्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव
सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी
किराणा सामानाच्या खरेदीसाठी बाहेर असताना, वानीने आपल्या कुटुंबाला सांगितले की, तो काही मिनिटांत घरी पोहोचेल. त्याच्या आईला शेवटचा फोन केल्यानंतर तासाभराने शेजाऱ्यांना त्याची गाडी जवळच्या बाजारपेठेत बेवारस अवस्थेत दिसली. त्यात किराणा सामान, चप्पल होती आणि सीटवर रक्ताचे डाग होते. त्यामुळे लष्कराच्या जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले असल्याचा संशय निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत यापूर्वीही अनेकदा घडले आहे.