काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

अमृता फडणवीसांच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

कन्हैय्या कुमारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अमृता फडणवीस सोशल मिडीयावर रील्स बनवण्यात व्यस्त असल्याचे कन्हैय्या कुमारने म्हटले होते. यावर आता थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांचा समाचार घेतला आहे. अशा नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता आपल्यासमोर येते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

आज तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, पराभवाने अस्वस्थ होवून असे हल्ले केले जातात. या अशा हल्ल्यावरून काँग्रेस, कन्हैय्या कुमार अशा नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता आपल्यासमोर येते. परंतु, माझ्यावर असे हल्ले बरेच झाल्याने मला याचा काही फरक पडत नाही.

हे ही वाचा : 

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास!

दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार

मुंबई शहरातील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

ते पुढे म्हणाले, मागील पाच वर्षात काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपूर्ण ट्रोल आर्मीसह माझ्या पत्नीवर हल्ले करत राहिले, बदनाम करत राहिले. मात्र, माझ्याविरुद्ध आणि पत्नीविरुद्ध त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे अशा प्रकारे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला, गलिच्छ विधाने, घाणेरडे व्हिडिओ तयार केले गेले.

आम्ही मात्र संयम ठेवला. कारण, खोटे बोलण्याचे वय कमी असते, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नाही’, असे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, यावरून महिलांप्रती यांची मानसिकता समोर दिसून येते, महिलांना बाहेर न पाठवता घरात कोंडून ठेवण्याची काँग्रेसची भूमिका समोर आली आहे.

 

Exit mobile version