थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

अम्पायरच्या चुकीमुळे सामना गमावला

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

तमिळनाडू प्रीमिअर लीग म्हणजेच टीएनपीएलमध्ये मोठी चूक समोर आली आहे. थेट यष्टिचित करताना एक फलंदाज बाद झाला, मात्र मैदानावरील पंचाने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली नाही. त्यामुळे या खेळाडूने नंतर ३४ धावा केल्या आणि त्याच्या संघाने सामनाही खिशात टाकला.

टीएनपीएलमध्ये सर्व नियम लागू आहेत. ब्रॉडकास्टर, डीआरएसदेखील आहे. तरीही यामधील एका सामन्यात चूक झाली आहे. लायका कोवाइ किंग्ज आणि सलेम स्पार्टन्स यांच्या दरम्यान सामना सुरू होता. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एस. सुजयने फलंदाजी केली. चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला. तिथे एका क्षेत्ररक्षकाने चेंडू थेट यष्टींवर मारला. सुजय तेव्हा दुसऱ्या टोकाला होता. मात्र, जेव्हा चेंडू लागला तेव्हा तो खेळपट्टीच्या आत होता. मात्र, त्याचा पाय हवेत होता. मैदानावरील पंचांना वाटले की तो खेळपट्टीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांनी क्षेत्ररक्षकांचे अपील मान्य केले नाही आणि त्यांनी सामना पुढे सुरू ठेवला.

हे ही वाचा:

समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ

मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!

…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!

हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांची परीक्षा पाहायची का? ‘आदिपुरुष’वरून न्यायालयाने झापले

मात्र, काही मिनिटांनंतर जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला, तेव्हा सुजय बाद असल्याचे आढळले. तेव्हा सुजय १० धावांवर खेळत होता. नंतर जेव्हा तो बाद झाला, तेव्हा त्याने ४४ धावा केल्या होत्या. सुजयच्या या खेळीमुळे लायका कोवाई किंग्सला चांगल्या धावा मिळाल्या आणि ते २०० धावांचे लक्ष्य समोर ठेवू शकले. हे लक्ष्य गाठताना सलेम स्पार्टनच्या संघाला जेमतेम १२० धावाच करता आल्या. जर सुजय त्यावेळी बाद झाला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

Exit mobile version