उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नोएडा पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. एका यु ट्यूब वृत्तवाहिनीने २०२५ च्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. व्हीडिओमध्ये, पत्रकाराने पश्चिम बंगालमधील मुस्लिम स्थलांतरित कामगारांना प्रश्न विचारले जे दिल्लीत वर्षानुवर्षे काम करत आहेत. मुलाखतीदरम्यान त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची उघडपणे धमकी दिली होती.
शेख अतौल असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो मुळचा बांगलादेशचा आहे. आपले कुटुंब बांगलादेश सीमा ओलांडून पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात स्थायिक झाल्याची कबुली शेखने दिली. यानंतर तो दिल्लीच्या शाहीन बागेत आला आणि राहू लागला. शेख अतौल याच्याकडून ३१५ बोअरचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, एक चाकू आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी हे शस्त्र ठेवण्यात आल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु केली आहे. आरोपी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहे का?, मुख्यमंत्री योगींवर हल्ला करण्याचा कट रचत होता का?, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी त्याच्यावर नोएडा सेक्टर ३९ पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशातील तरुण इस्रायलला जातायत तर, काँग्रेस ‘पॅलेस्टाईन’ची बॅग घेऊन फिरतेय!
उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?
दिनेश राठोड ठरला ‘नवोदित मुंबई श्री’
राहुल गांधींच्या रायबरेलीत ५२ हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे सापडली!