क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!

छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. क्रीडा विभागात २१ कोटी घोटाळा प्रकरणात आरोपी हर्षकुमार क्षीरसागर ११ दिवसापासून फरार होता. आज अखेर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आरोपीची मैत्रीण अर्पिता वाडकरला देखील करून चौकशी करण्यात आली आहे.

या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक करण्यात आली. दिल्लीतून त्याला ताब्यात घेतले. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या आई-वडीलांना कर्नाटकच्या मुरुडेश्वर मधून ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी हर्षकुमार क्षीरसागर हा संभाजी नगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी लिपिक पदावर कार्यरत होता. विशेष म्हणजे, याचा पगार केवळ १३ हजार पण त्याने तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपये कमावल्याचे निदर्शनास आले होते. हर्षकुमार क्षीरसागर वर्षभरातच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून कोट्यावधी रुपये आपल्या २ बँक खात्यांवर वळते केले. नंतर ते त्याने १५ पेक्षा जास्त खात्यावर वळवून खर्च केले.  यासाठी त्याने यशोदा शेट्टी या कर्मचाऱ्याचीही मदत घेतली. वर्षभरानंतर हे सर्व उघडकीस आले आणि सर्वांना एकच धक्का बसला. प्रकरण उघडकीस येताच आरोपीने पळ काढला. या प्रकरणी पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत शोध सुरु केला होता.

हे ही वाचा : 

गडचिरोलीत नववर्षाची नवी पहाट; ताराक्कासह ११ कट्टर माओवादी शरण!

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

अमेरिकेत नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत ट्रक घुसवून गोळीबार

द बीड स्टोरी…

आरोपी हर्षकुमार क्षीरसागरकडे सापडलेली संपत्ती

१.३५ कोटींची बीएमडब्ल्यू कार
१.२० कोटी रुपयांचे वडिलांचे ४ फ्लॅट
१ कोटी खर्च करून घरात इंटिरियरचं काम
बँक खात्यात ३ कोटींची रक्कम
चीनमधून ५० लाखांची खरेदी
४० लाखांच्या २ स्कोडा कार
३२ लाखांची बीएमडब्ल्यू बाईक

हर्षकुमारची मैत्रिण अर्पिता वाडकरकडेही कोट्यवधींची संपत्ती सापडलीय 

संभाजीनगरच्या चिखलठाण्यात १.३५ कोटींचा फ्लॅट
मुंबईत १.०५ कोटींचा फ्लॅट
१.४४ लाखांचा आयफोन
१५ लाखांची स्कोडा गाडी
१.०९ लाखांचा स्मार्टफोन
३ बँका खात्यात १ कोटी १ लाख रुपये

Exit mobile version