‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

‘गडकरी’ सिनेमा २७ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्याचा उलगडा लवकरच रुपेरी पडद्यावर होणार आहे. त्यांचे आयुष्य आणि राजकीय कारकीर्द लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अक्षय अनंत देशमुख हे या ‘गडकरी’ सिनेमाचे निर्माते असून या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोणाला पाहायला मिळाणार आहे हे प्रश्न सध्या अनुत्तरीत असून यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

हे ही वाचा:

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. दरम्यान, करोना काळात चित्रपटाचे काम थांबले होते. या चित्रपटासाठी नितीन गडकरी यांच्याविषयी सगळी माहिती ही त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून घेण्यात आली आहे. राजकीय मुद्दा चित्रपटात न मांडता तरुणांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा मिळावी यादृष्टीने सिनेमा बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांचे स्वतःचे कोणतेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना त्यांनी राजकारणात स्वत:चं स्थान मिळवलं.

Exit mobile version