आज, १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्यावेळी सभेच्या सुरवातीला एका चित्रपटाचे टीजर प्रदर्शित करण्यात आले. ह्या चित्रपटाचे ‘महाराष्ट्र शाहीर’ असे नाव असून, ज्याने ‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले त्या लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे.
महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून आज राज ठाकरेंच्या सभेपूर्वी या चित्रपटाचे टीजर प्रदर्शित झाले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी दिसणार असून चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट महाराष्ट्र्राची लोककला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे महान कलावंत शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. शाहीर साबळे यांचे वयाच्या ९२ व्य वर्षी २०१५ साली मृत्यू झाला. मात्र तरीही त्यांचे ‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे अजनूही तितकेच लोकप्रिय आहे.
हे ही वाचा:
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने होणार स्वस्त
फर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त
‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘भोंगा’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले होते. हा चित्रपट देखील मनसेकडून ३ मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. मनसे भोंग्यांच्या विषयावरून आक्रमक झाल्यानंतर ह्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.